राजस्थान रणजी संघाचा माजी क्रिकेटपटू रोहित शर्मा याचे निधन झाले आहे. मागच्या काही काळापासून रोहित आजारी होता. त्याच्या निधनाची बातमी समोर येताच राजस्थान क्रिकेटमध्ये शोककळा परसली आहे. रोहितचे नाव राजस्थान क्रिकेट संघाला लाभलेल्या आक्रमक फलंदाजांपैकी एक राहिला होता.
नुकताच अखेरचा श्वास घेतलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) राजस्थानसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळला. त्याने रणजी ट्रॉफीचे 7 सामने खेळले. लीस्ट ए क्रिकेटमध्ये 28, तर टी-20 फॉरमॅटमध्ये एकूण 4 सामने खेळण्याची संधी त्याला मिळाली. रोहित एक अष्टपैलू खेळाडू असून त्याने बॅट आणि चेंडू या दोन्हींनी संघासाठी योगदान दिले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावापुढे 166 धावांची नोंद आहे. पण गोलंदाजाच्या रुपात या फॉरमॅटमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. लीस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने फलंदाज म्हणून 850, तर टी-20 क्रिकेटमध्ये 131 धावा केल्या. लीस्ट ए मध्ये त्याला 1 तर टी-20 मध्ये 6 विकेट्स घेता आल्या.
रोहित शर्माने 2004 साली प्रोफेशनल क्रिकेट खेळायला सुरुवात केली. नोव्हेंबर 2004मध्ये त्याने सर्विसेसविरुद्धच्या सामन्यातून राजस्थानसाठी पदार्पण केले. आपला शेवटचा सामना त्याने राजस्थानसाठी मार्च 2014 मध्ये रेलवेविरुद्ध लीस्ट एक फॉरमॅटमध्ये खेळला. राजस्थान क्रिकेट असोसिएसनच्या सचिव भवानी शंकर सामोता यांनी सांगितले की, रोहित एक अष्टपैलू खेळाडू होता. तो ताबडतोड फलंदाजीसाठी ओळखला जायचा. सोबतच लेग स्पिन गोलंदाजीनेही महत्वपूर्ण योगदान देत होता.
महत्वाच्या बातम्या –
के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये अहमदनगर, नांदेड, धुळे व बीड संघाची विजयी सलामी
Ranji Trophy 2024 । फायनलमध्ये रंगणार मुंबई-विदर्भ थरार, उपांत्य सामन्यात मध्य प्रदेश पराभूत