आयपीएल 2023 च्या 52 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थानवर निसटता विजय मिळवला. हैदराबादने अखेरच्या चेंडूवर राजस्थानला 4 विकेट्सने पराभूत केले. अनेकांनी या सामन्याला आयपीएल इतिहासातील सर्वात नाट्यमय सामना म्हटले. अखेरच्या षटकात घडलेल्या अनेक गोष्टींमुळे या सामन्यातील रंगत टिकून राहिली.
WHAT. A. GAME 😱😱
Abdul Samad wins it for the @SunRisers as he hits a maximum off the final delivery. #SRH win by 4 wickets.
Scorecard – https://t.co/1EMWKvcgh9 #TATAIPL #RRvSRH #IPL2023 pic.twitter.com/yh0WVMEbOz
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2023
यशस्वी जयस्वाल, जोस बटलर व संजू सॅमसन यांच्या तुफानी फलंदाजीमुळे राजस्थानने 3 बाद 214 अशी मोठी धावसंख्या उभारली होती. या धावांचा पाठलाग करताना हैदराबादसाठी सर्वच फलंदाज योगदान देताना दिसले. त्याचवेळी अखेरच्या दोन षटकात राजस्थानने स्वैर मारा केला. दोन षटकात 41 धावांची गरज असताना कुलदीप यादवच्या षटकात ग्लेन फिलिप्स याने केलेल्या 22 सह 24 धावा निघाल्या. त्यामुळे अखेरच्या षटकात संदीप शर्मासमोर 17 धावा वाचवण्याचे आव्हान होते.
षटकातील पहिल्या चेंडूवर संदीप अब्दुल समदचा झेल उडवण्यात यशस्वी ठरला. मात्र, ओबेद मेकॉय झेल टिपण्यात अयशस्वी ठरला व दोन धावा मिळाल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर समदने षटकार खेचत सामना रंगतदार बनवला. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा दोन धावा घेण्यात त्याला यश आले.
संदीपने चौथा चेंडू यॉरकर टाकत एक धाव दिली. तर पाचव्या चेंडूवर पुन्हा एक धाव निघाल्याने समद स्ट्राईकवर आला. अखेरच्या चेंडूवर हैदराबादला विजयासाठी पाच धावांची गरज होती. संदीपने टाकलेल्या या उत्कृष्ट चेंडूवर समद बाद झाला आणि राजस्थानने विजयी जल्लोष सुरू केला.
इतक्यात पंचांनी हा नोबॉल असल्याचे जाहीर केले आणि सर्वजण चकित अखेरचा चेंडूवर एकही धाव न घेतल्याने पुन्हा एकदा समद हाच स्ट्राइकवर होता. चार धावांची गरज असताना त्याने या चेंडूवर षटकार ठोकत संघाला आयपीएल इतिहासातील आपली सर्वात मोठी धावसंख्या गाठून दिली.
या पराभवामुळे राजस्थानच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या मनसुब्यांना मोठा धक्का बसला आहे. तर, विजयी हैदराबादने स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले.
(Rajasthan Royals Against Sunrisers Hyderabad Last Over Thriller Abdul Samad Sandeep Sharma)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जयसवालचा भीमपराक्रम! IPLमध्ये ‘यशस्वी’रीत्या 1000 धावा पूर्ण, दिग्गजांना पछाडत केला ‘हा’ विक्रम
असे 5 खेळाडू, ज्यांनी IPLमध्ये हैदराबादविरुद्ध केल्यात सर्वाधिक धावा; संजू 208 धावांनी विराटच्या पुढे