आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सर्व संघांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सर्व संघांनी आपल्या रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी देखील जाहीर केली. स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, हरभजन सिंग, केदार जाधव सारख्या खेळाडूंना संघांनी सोडले असल्याने आगामी आयपीएल लिलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या स्टार खेळाडूंसोबतच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करत असलेल्या भारतीय खेळाडूंना देखील आयपीएल लिलावात मोठी बोली लागू शकते. अनेक संघांनी लिलावापूर्वी आपापली रणनिती आखलेली असणार आहे. या दरम्यानच राजस्थान रॉयल्सने मजेशीर ट्विट करत आपल्या रणनितीचा खुलासा केला आहे.
राजस्थान रॉयल्सने मजेशीर ट्विट करत काही चित्रपटांमधील कलाकारांना आपल्या संघामध्ये सामविष्ट करत असल्याचे स्पष्ट केले आहे. राजस्थान रॉयल्सने सुप्रसिद्ध चित्रपट ‘लगान’ चित्रपटातील आमिर खान, ‘इकबाल’ चित्रपटातील श्रेयस तलपडे, ‘चैन कुली की मेन कुली’मधील करन आणि सुप्रसिद्ध टीवी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील जेठालाल या पात्रांचा फोटो शेअर केला आहे. राजस्थान रॉयल्सच्या या ट्विटवर क्रिकेट फॅन्सने देखील मजेशीर कमेंट्स केलेल्या आहेत.
Some hot picks at the #IPL2021 Auction…🙈
Who do you want?#HallaBol | #RoyalsFamily pic.twitter.com/wRkYy2CErP
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) February 2, 2021
https://twitter.com/SamCurranFC07/status/1356609596694036481?s=20
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) February 2, 2021
You have forgotten about one.. pic.twitter.com/6deJrc9uXm
— Himanshu Agrawal 🇮🇳 (@himanshu_230) February 2, 2021
Lasith golinga pic.twitter.com/HlW2hniMPu
— vijay (@puntasticVU) February 2, 2021
राजस्थानसाठी हा लिलाव अतिशय महत्त्वाचा असणार आहे. राजस्थानने या लिलावापूर्वी मोठा निर्णय घेत मागील वर्षीचा कर्णधार स्टीव स्मिथला रिलीज केले. स्मिथला सोडल्यानंतर त्यांनी संजू सॅमसनला संघाचे कर्णधारपद दिले. मागील बऱ्याच वर्षापासून निराशाजनक कामगिरी करत असलेल्या राजस्थानला या आयपीएल लिलावत महत्त्वपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे. राजस्थान रॉयल्स समर्थकांना आशा असेल की, ते सर्वोत्तम खेळाडू आपल्या संघात समाविष्ट करतील व पुन्हा नव्या जोशात मैदानात उतरतील.
महत्त्वाच्या बातम्या-
स्मिथ, वॉर्नरसह इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ‘या’ अटीवर मिळणार आयपीएल २०२१ मध्ये एन्ट्री
“भारतात कसोटी क्रिकेट खेळतांना आयपीएलचा अनुभव नाही येणार कामी”, ‘या’ इंग्लिश गोलंदाजाची स्पष्टोक्ती
“….आणि सचिनला अस्वस्थ करत केले बाद”, नासिर हुसेनने उलगडला बंगलोर कसोटीचा किस्सा