आयपीएल २०२२ हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. सर्व आयपीएल फ्रेंचायझींनी आगामी हंगामासाठी सरावाला सुरुवात केली आहे. मागच्या महिन्यात पार पडलेल्या आयपीएल मेगा लिलावात संघांनी स्वतःच्या आवश्यकतेनुसार खेळाडूंवर बोली लावली आणि त्यांना संघीत सामील केले. राजस्थान रॉयल्सने २६ वर्षीय शुभम गढवालला संघात सामील केले आहे, जो माजी दिग्गज युवराज सिंगप्रमाणे फलंदाजी करू इच्छित आहे.
मेगा लिलावात शुभम गढवाल (Shubham Garhwal) याची बेस प्राइस २० लाख रुपये होती आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने त्याला २० लाख रुपये देऊन विकत घेतले. गढवाल एक डावखुरा फलंदाज आहे, जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये जोधपूरसाठी खेळतो आणि मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला त्याचा आवडता भारतीय दिग्गज युवराज सिंग (Yuvraj Singh) प्रमाणे फलंदाजी करायची आहे.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०११ मध्ये क्वॉर्टरफायनल सामन्यात भारतापुढे ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. या सामन्यात युवराज सिंगने धमाकेदार फलंदाजी केली होती आणि संघाला विजय मिळवून दिला होता. त्यावेळी शुभम गढवाल १५ वर्षांचा होता आणि त्याने त्या वयात युवराजला स्वतःचा आदर्श मानले होते. आता या गोष्टीला एक दशक उलटून गेले आहे आणि गढवालला पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. आगामी हंगामात तो युवराज सिंगप्रमाणेच निडर फलंदाजी करू इच्छित आहे.
आयपीएल २०२२ पूर्वी राजस्थान रॉयल्स संघ नागपुरमध्ये सराव करत आहे. त्यावेळी गढवाल म्हणाला की, “मी तेव्हा खूप लहान होतो, माझ्या गावी जोधपूरमध्ये गल्ली क्रिकेट खेळत होतो आणि मला बॅट नीट पकडताही येत नव्हती. पण २०११ साली युवराजने विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम प्रदर्शन केले आणि मला खूप प्रेरित केले होते. मी देखील एक डावखुरा खेळाडू आहे, तो (युवराज) ज्या पद्धतीने जास्त कष्ट न घेता चेंडू मारायचा, मला ते खूप आवडायचे. मला वाटते ती अशी वेळ होती, ज्यामुळे माझे आयुष्य बदलले.”
शुभम गढवाल मुळचा राजस्थानचाच आहे आणि आयपीएलमध्ये स्वतःच्याच राज्याचे प्रतिनिधित्व करत आहे. तो म्हणाला, “राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने मला खूप अभिमान वाटतो आहे. कारण मी स्वतः राजस्थानमधून आलो आहे आणि हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे. माझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला, तो मला संघासाठी सर्वश्रेष्ट प्रदर्शन देण्यासाठी प्रेरित करत आहे.”
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्स संघाची नवीन जर्सी लाँच; २८ मार्चला फुंकणार रणशिंग
तेलही गेलं अन् तूपही गेलं! शतक ठोकण्याच्या नादात विराटने खराब केला आपला ६ वर्षांचा रेकॉर्ड
“इंग्लंडने आमचा अपमान केला”; पहिल्या कसोटीनंतर संतापला वेस्ट इंडीजचा दिग्गज