राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेचा 11वा सामना खेळला गेला. गुवाहाटीच्या क्रिकेट मैदानावरील या सामन्यात राजस्थान संघ नाणेफेक गमावत फलंदाजीला उतरला. यावेळी राजस्थानच्या दोन्ही सलामीवीरांनी तुफानी फलंदाजी केली. अनुभवी जोस बटलर याने आपला शानदार फॉर्म कायम राखत आणखी एक अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर आयपीएलमध्ये दिवसाच्या सामन्यांमध्ये त्याची आकडेवारी आणखीनच शानदार होताना दिसत आहे.
हैदराबाद विरुद्ध पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात तो 19 धावा करू शकलेला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा लय प्राप्त केली. सुरुवातीला जयस्वालने आक्रमक खेळ दाखवल्यानंतर त्याने देखील रूप बदलत आपली खेळी पुढे नेली. सलग तीन गडी बाद झाल्यानंतर तो काहीच शांत झालेला. मात्र, पुन्हा एकदा त्याने धावांची गती वाढवत आपली खेळी मोठी केली. त्याने बाद होण्यापूर्वी 51 चेंडूवर 11 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 79 धावा केल्या.
आयपीएलमध्ये सामने प्रामुख्याने सायंकाळच्या वेळी खेळले जातात. मात्र, शनिवार व रविवारी दोन सामने असल्याने दुपारच्या वेळी सामना सुरू होतो. अशा दुपारच्या सामन्यांमध्ये बटलरची आकडेवारी आणखीनच शानदार दिसून येते. बटलरने दुपारच्या वेळी 7 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. यादरम्यान त्याने 72.7 च्या सरासरीने 509 धावा कुटल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट देखील 167.20 असा जबरदस्त राहिला. विशेष म्हणजे यामध्ये तीन अर्धशतके व दोन शतके झळकावली आहेत.
बटलर हा मागील हंगामापासून जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून आला आहे. मागील वर्षी त्याने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप आपल्या नावे केली होती. आता देखील तीन सामन्यानंतर तोच ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. राजस्थानला दुसरे विजेतेपद पटकावण्यासाठी त्याचा हाच फॉर्म कायम राहणे गरजेचे असेल.
(Rajasthan Royals Jos Buttler Smashing Runs In Day Games In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नवख्या जयसवालचा गुवाहाटीत धमाका! पहिल्याच ओव्हरमध्ये केली ‘अशी’ कामगिरी, थेट गेल-वॉर्नरच्या यादीत नाव
विमानात ब्लॉग करायला निघालेल्या चाहरला धोनीने दिलं हाकलून? दोनदा झाली ‘हटाई’, पाहा व्हिडिओ