मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील रोमांचक लढत चाहत्यांना रविवारी (30 एप्रिल) अनुभवता आली. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 212 अशी मोठी धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तरात मुंबईच्या फलंदाजांनीही तितक्याच आक्रमकपणे तीन चेंडू राखून धावांचा पाठलाग केला. मुंबईचा हा स्पर्धेतील चौथा विजय ठरला. मात्र, याच सामन्यात राजस्थानचा गोलंदाज संदीप शर्मा याने मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादव याचा घेतलेला झेल चर्चेचा विषय ठरला आहे.
राजस्थानने उभारलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईसाठी सूर्यकुमार यादव हा एकहाती सामना पुढे घेऊन चालला होता. त्याने राजस्थानच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण करत अर्धशतक साजरे केले. त्याने अवघ्या 29 चेंडूवर 8 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 55 धावा कुटल्या. त्याची ही खेळी संपवण्यासाठी संदीप शर्मा याने एक लाजवाब झेल पूर्ण केला.
WHAT. A. CATCH! 🤯
Spectacular effort from Sandeep Sharma to get the wicket of Suryakumar Yadav 👏🏻👏🏻#MI need 43 off 18.
Follow the match ▶️ https://t.co/trgeZNGiRY #IPL1000 | #TATAIPL | #MIvRR pic.twitter.com/0PVyi5z7SB
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023
सोळाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ट्रेंट बोल्ट याला स्क्वेअर लेगच्या दिशेने उंचावरून त्याने फटका मारला. त्यावेळी सर्कलमध्ये उभ्या असलेल्या संदीप शर्मा याने उलटे धावत जाऊन जवळपास 19 मीटरचे अंतर पूर्ण करत झेपावत एक अप्रतिम झेल पूर्ण केला. अनेकांनी त्या झेलास हंगामातील आत्तापर्यंतचा सर्वोत्तम झेल म्हटले. तर काहींनी याची तुलना कपिल देव यांनी 1983 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत विव रिचर्ड्स यांच्या टिपलेल्या झेलाशी केली.
या सामन्याचा विचार केल्यास राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थान संघासाठी या सामन्यात केवळ सलामीवीर यशस्वी जयस्वाल हाच झुंज देऊ शकला. आपल्या घरच्याच मैदानावर खेळत असलेल्या यशस्वी याने 62 चेंडूवर 124 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली होती. मात्र, सूर्यकुमार यादवने वादळी अर्धशतक झळकावत संघाला विजयाच्या दिशेने नेले. अखेरीस टीम डेविड याने 14 चेंडूवर नाबाद 45 धावा करून संघाला विजय मिळवून दिला.
(Rajasthan Royals Sandeep Sharma Took Stunning Catch Of Suryakumar Yadav Against Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितला बाद देण्याचा निर्णय वादात! पंचांनी केले दुर्लक्ष? सोशल मीडियावर रंगली चर्चा
वानखेडेवर डेव्हिडचीच दहशत! आजवर 98 चेंडू खेळत ठोकलेत इतके षटकार, स्ट्राइक रेट तर बापच