भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला भारतीय क्रिकेट संघामधून अनेकदा डावलण्यात आले आहे. मात्र, इंडियन प्रीमियर लीगमध्ये सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरीही उंचावली आहे. आयपीएलच्या जोरावर सॅमसनने मोठा चाहतावर्ग बनवला आहे. असे असतानाच आता त्याच्याविषयी आता एक महत्त्वाचा खुलासा केला गेला.
संजू हा मागील 10 वर्षापासून राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. तसेच, मागील 3 वर्षांपासून तो संघाचे नेतृत्व देखील करत आहे. त्याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसून आला. असे असतानाच, मागील वर्षी त्याला इतर संघांकडून खेळण्याची ऑफर आल्याचा खुलासा राजस्थान रॉयल्सचा ट्रेनर राजामणी याने केला. एका मुलाखतीत बोलताना राजामणी म्हणाला,
“संजू आणि राजस्थान रॉयल्स हे एक भावनिक नाते आहे. आयपीएल 2022 आधी त्याला तीन संघांकडून थेट कर्णधारपद देण्याची ऑफर आली होती. त्याच्या जागी इतर कोणी असते तर ही ऑफर सहज स्वीकारली असती. मात्र, त्याने या तीनही संघांना नकार दिला.”
याच मुलाखतीत राजामनी यांनी सांगितले की, संजू आपल्याला आयपीएलमधून मिळणाऱ्या 15 कोटी रकमेतील दोन कोटी रुपये युवा खेळाडू तसेच पायाभूत सुविधांसाठी खर्च करत असतो. त्यामुळे त्याची इतकी लोकप्रियता आहे.
यावर्षी राजस्थान रॉयल्स व संजू सॅमसन यांची कामगिरी संमिश्र राहिली. चांगल्या सुरुवातीनंतरही राजस्थानला प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. त्यांनी आपले अभियान पाचव्या क्रमांकावर समाप्त केले. दुसरीकडे संजू याला देखील मोजक्या सामन्यातच चांगली कामगिरी करता आली. सध्या मिळत असलेल्या बातमीनुसार संजू याच्याकडे भारताच्या टी20 संघाचे उपकर्णधारपद देण्यात येऊ शकते.
(Rajasthan Royals Trainer Rajamani Said Sanju Samson Denied 3 Teams Captaincy Offers From IPL 2022)
महत्वाच्या बातम्या –
सेहवाग-गावसकरांना नैतिकतेचे धडे देणारा गंभीर चाहत्यांच्या निशाण्यावर, म्हणाले, “तू करून बसला अन्…”
मैदानावर न उतरताही अश्विन-पंतने राखली टीम इंडियाची लाज! वाचा नक्की काय घडलं