---Advertisement---

बोल्ट बनतोय बॉस! पुन्हा टाकली पहिलीच ओव्हर मेडन, चालू हंगामात घालतोय धुमाकूळ

On: बुधवार, एप्रिल 19, 2023 8:38 PM
---Advertisement---

आयपीएल 2023चा 26वा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांतील हा सामना राजस्थानचे होम ग्राउंड सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूरमध्ये खेळला जात आहे. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. संघाचा प्रमुख गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने पुन्हा एकदा निर्धाव षटक टाकले.

मागील हंगामापासून राजस्थानसाठी खेळणाऱ्या बोल्ट याने पहिल्या शतकात नेहमीच धारदार गोलंदाजी केलेली आहे. या सामन्यातही त्याने समोर लखनऊचा कर्णधार केएल राहुल असताना आपला दर्जा दाखवून दिला. त्याने पहिले षटक अत्यंत योग्य टप्प्यावर टाकत निर्धाव काढले. या हंगामातील ही तिसरी वेळ आहे ज्यावेळी त्याने पहिले षटक टाकताना एकही धाव दिली नाही.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने दोन बळी मिळवताना एकही धाव दिली नव्हती. त्यानंतर दिल्लीविरुद्ध देखील त्यांनी असाच कारनामा केला. पंजाबविरुद्ध आठ तर गुजरातविरुद्ध सहा धावा त्याने दिलेल्या. त्याने पहिल्या षटकात टाकलेल्या 30 चेंडूंपैकी केवळ 4 चेंडूंवर धावा आल्या असून, तब्बल 26 चेंडू निर्धाव टाकण्यात त्याला यश आले आहे.

बोल्ट हा आयपीएल इतिहासात देखील सर्वाधिक वेळा पहिले षटक निर्धाव टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहोचला. त्याने व भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी आठ वेळा ही कामगिरी केलीये. आयपीएल इतिहासात सर्वाधिक निर्धाव षटके टाकण्याची कामगिरी प्रवीण कुमार याच्या नावे असून त्याने आपल्या कारकिर्दीत तब्बल 14 वेळा निर्धाव षटके टाकली होती. तर भुवनेश्वर बारा षटकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

(Rajasthan Royals Trent Boult Third Time Bowl First Maiden Over In IPL 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वीच चहलचा मोठा खुलासा! म्हणाला, आम्ही ‘या’ नियमाचा सर्वाधिक फायदा उचलला
अखेर 14 वर्षांचा वनवास संपला! अर्जुनने घडवून आणली क्रिकेट इतिहासातील अतिदुर्मिळ घटना

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---