मुंबई । आयपीएलच्या 13 व्या हंगामातील ४ था सामना मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळण्यात येणार आहे. या हंगामातील राजस्थान रॉयल्सचा हा पहिला सामना आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. सीएसके संघासाठी चांगली बातमी म्हणजे ऋतुराज गायकवाड परतला आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होण्यासाठी सज्ज आहे.
नेत्रदीपक कामगिरीमुळे चेन्नईचा आत्मविश्वास वाढला आहे. सॅम करनने शानदार अष्टपैलू कामगिरी करून स्वत: ला सिद्ध केले आहे. सीएसकेचा धडाकेबाज अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो पुढच्याही सामन्यात खेळणार नाही. असे असले तरी बेन स्टोक्स आणि स्टीव्ह स्मिथशिवाय राजस्थान रॉयल्सला सीएसकेचे आव्हान अवघड जाणार आहे. पहिल्या सामन्यात बेन स्टोक्स संघाबाहेर आहे, तर दुखापत झालेल्या स्मिथच्या खेळण्यावर संशय आहे. जॉस बटलरसुद्धा पहिल्या सामन्यातून बाहेर पडेल, कारण तो आपल्या कुटूंबासह स्वतंत्रपणे आला आहे. त्यामुळे त्याला क्वारंटाइनमध्ये 36 तास दुबईतच रहावे लागेल.
-चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना कधी खेळला जाईल?
22 सप्टेंबर रोजी मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळला जाईल.
-चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना कोठे खेळला जाईल?
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
-चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना कधी सुरू होईल?
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता सुरू होईल.
-चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण आपण कुठे पाहू शकता?
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचे प्रसारण स्टार नेटवर्कवर आणि हॉटस्टारवर पाहता येईल.
महत्त्वाच्या बातम्या-
-हैद्राबाद विरुद्ध बेंगलोर संघातील सामन्यात झाली तब्बल एवढ्या विक्रमांची नोंद; घ्या जाणून
-‘या’ दिवशी करोडो भारतीयांना विराट कोहलीसह मिलिंद सोमण देणार फिटनेस मंत्र
-थ्री डायमेंशन खेळाडू ठरला फ्लॉप; सोशल मीडियावर थ्री डी मिम्स होतायेत व्हायरल
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा ४ फलंदाज
-पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दिल्लीचे ‘हे’ ५ खेळाडू खेळले नसते तर काही खरं नव्हतं
-विराट कोहली-डेव्हिड वॉर्नरच्या संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन, पहा कुणाला मिळेल जागा