आयपीएल 2020 च्या तिसर्या सामन्यात आरसीबी संघाने सनरायझर्स हैद्राबाद (एसआरएच) संघाला 10 धावांनी पराभूत करत विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबी संघाने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 163 धावा केल्या.प्रत्युत्तरात सनरायझर्स हैद्राबाद संघाचा डाव 19.4 षटकांत 153 धावांत संपुष्टात आला. या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत 2 गुण मिळविले आहेत.
या सामन्यादरम्यान दोन्ही संघांनी बरेच चांगले आणि मनोरंजक विक्रम नोंदविले आहेत. या लेखात आपण त्या विक्रमांविषयी जाणून घेणार आहोत.
सामन्यादरम्यान झालेल्या विक्रमांची यादी:
-सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध आरसीबीचा हा 7 वा विजय होता. यापूर्वी दोन्ही संघांमध्ये एकूण 15 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 8 सामने हैद्राबादने जिंकले तर 6 सामने आरसीबीने जिंकले होते. त्याच वेळी, एक सामना अनिर्णीत राहिला होता.
-फिरकीपटू युझवेंद्र चहलने आयपीएलमध्ये 2.1 षटक टाकताच तो 300 षटके टाकलेल्या गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.
-युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने आरसीबीकडून पदार्पण केले आणि पदार्पण सामन्यातच पहिले अर्धशतक झळकावले.
-देवदत्त पाडिक्कलने 42 चेंडूंत 56 धावा केल्या, तो आरसीबीकडून पदार्पणात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
-दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा निवृत्त फलंदाज एबी डिविलियर्सने आरसीबीकडून खेळताना आपले 200 षटकार पूर्ण केले. टी20 चा स्टार फलंदाज ख्रिस गेलनंतर तो दुसरा खेळाडू ठरला आहे.
-देवदत्त पडीक्कलने पदार्पनाच्या सामन्यात केलेल्या धावा
प्रथम श्रेणी: 50 धावा विरुद्ध महाराष्ट्र
अ दर्जा: 50 धावा विरूद्ध झारखंड
टी -20: 50 धावा विरुद्ध उत्तराखंड
आयपीएलः 50 धावा विरुद्ध एसआरएच
-इंग्लंड क्रिकेट संघाचा फलंदाज जॉनी बेयरस्टोने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याने आयपीएलमध्ये शतकही केले आहे.
-उमेश यादव विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद शेवटचे चार सामने
0/31 (4)
0/47 (4)
0/46 (4)
0/48 (4)
-आयपीएलच्या पहिल्याच डावात 50 पेक्षा अधिक धावा करणारे युवा खेळाडू
19 वर्ष 1 दिवस- एस गोस्वामी (2008)
20 वर्ष 76 दिवस- देवदत्त पडिक्कल (2020) *
22 वर्ष 136 दिवस- एस धवन (2008)
22 वर्ष 187 दिवस- डेव्हिड वॉर्नर (2009)
महत्त्वाच्या बातम्या-
-‘या’ दिवशी करोडो भारतीयांना विराट कोहलीसह मिलिंद सोमण देणार फिटनेस मंत्र
-दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी; ‘या’ खेळाडूची दुखापत झाली कमी
-कौशल्य असेल तर तुम्ही कोणत्याही फलंदाजाला करू शकता बाद; या गोलंदाजाने दाखवून दिले
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा ४ फलंदाज
-पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दिल्लीचे ‘हे’ ५ खेळाडू खेळले नसते तर काही खरं नव्हतं
-विराट कोहली-डेव्हिड वॉर्नरच्या संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन, पहा कुणाला मिळेल जागा