---Advertisement---

‘या’ दिवशी करोडो भारतीयांना विराट कोहलीसह मिलिंद सोमण देणार फिटनेस मंत्र

---Advertisement---

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 सप्टेंबरला ‘फिट इंडिया’ चळवळीचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आयोजित देशव्यापी ऑनलाईन ‘फिट इंडिया’ संवादात फिटनेससाठी प्रभाव पाडणार्‍या लोकांशी संवाद साधतील. यात  भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीचाही समावेश आहे.

एका अधिकृत माहितीनुसार, “ऑनलाइन संभाषणात सामील असलेले लोक तंदुरुस्ती आणि चांगल्या आरोग्याबद्दल सांगतील. त्यांच्या विचारांवर पंतप्रधान मोदीही मार्गदर्शन करतील. यावेळी लोक त्यांच्या फिटनेस प्रवासाबद्दल सांगतील आणि टीप्सदेखील देतील. त्यामध्ये विराट कोहली, मिलिंद सोमण ते रुजुता स्वेकर यांचा समावेश असणार आहे.”

कोव्हिड-19 च्या काळात फिटनेस हा जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू बनला आहे. या संवादात, पोषण, आरोग्य आणि तंदुरुस्तीवर चर्चा केली जाईल.

पीएमओ कार्यालयाच्या माहितीनुसार, “फिट इंडिया चळवळीची कल्पना पंतप्रधानांनी जनआंदोलन म्हणून केली होती. देशातील नागरिकांना तंदुरुस्त राष्ट्र बनविण्यासाठी फिट इंडिया चळवळीची कल्पना अंमलात आणली गेली. यात नागरिकांना मौज मजा करण्याचा सोपा आणि स्वस्त मार्गांचा समावेश आहे. जेणेकरून ते तंदुरुस्त राहतील आणि शरीरात बदल घडवून आणतील. त्यामुळे प्रत्येक भारतीयांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग फिटनेस बनतो.”

‘फिट इंडिया’ चळवळीच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये देशभरातील लोकांचा उत्साहाने सहभाग होता.  फिट इंडिया फ्रीडम रन, ब्लॉक रन, सायक्लोथन, फिट इंडिया वीक, फिट इंडिया स्कूल सर्टिफिकेट इत्यादी अनेक कार्यक्रमांमध्ये 3.5 कोटीहून अधिक लोकांचा सहभाग दिसून आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-थ्री डायमेंशन खेळाडू ठरला फ्लॉप; सोशल मीडियावर थ्री डी मिम्स होतायेत व्हायरल

-दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी; ‘या’ खेळाडूची दुखापत झाली कमी

-कौशल्य असेल तर तुम्ही कोणत्याही फलंदाजाला करू शकता बाद; या गोलंदाजाने दाखवून दिले

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा ४ फलंदाज

-पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दिल्लीचे ‘हे’ ५ खेळाडू खेळले नसते तर काही खरं नव्हतं

-विराट कोहली-डेव्हिड वॉर्नरच्या संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन, पहा कुणाला मिळेल जागा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---