मुंबई । भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनला आशा आहे की लवकरच तो खांद्याच्या दुखापतीतून बरा होईल, कारण त्याच्या खांद्याच्या वेदना कमी होत आहे. सोबतच त्याच्या स्कॅनचा अहवालही चांगला आला आहे.
अश्विन सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतोय. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यादरम्यान, त्याला पहिल्याच षटकातील शेवटचा चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात दुखापत झाली. यापूर्वी त्याने या षटकात दोन धावा देत दोन महत्त्वपूर्ण गडी बाद केले आणि सामना दिल्ली कॅपिटल्सकडे झुकवला.
अश्विनने ट्विट केले की, “काल रात्री मला मैदान सोडताना खूप वेदना होत होत्या, पण आता वेदना कमी झाल्या आहेत आणि स्कॅनचा अहवालदेखील खूप चांगला आला आहे. आपुलकी आणि सहकार्याबद्दल धन्यवाद.”
I was in pain as I left the field last night, but the pain has settled down and the scan reports are pretty encouraging too. Thanks for all your love and support. ???? #IPL2020
— Ashwin ???????? (@ashwinravi99) September 21, 2020
तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, “इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील पुढील सामन्यापूर्वी अश्विन खांद्याच्या दुखापतीतून बरे होण्याची आशा आहे. परंतु अंतिम निर्णय टीम फिजिओ पेट्रिक फरहार्ड घेतील.”
तो पुढे म्हणाला, “अश्विनशी माझी चर्चा झाली आहे आणि पुढच्या सामन्यासाठी तो तयार असल्याचे त्याने म्हटलं आहे. या बाबतीत, अंतिम निर्णय फिजिओला घ्यावा लागेल. तो एक मजबूत मनाचा खेळाडू आहे आणि पुढील सामन्यापूर्वी तो उपलब्ध होईल, अशी आशा आहे.”
आयपीएलमध्ये रविवारी दुबईत दिल्ली आणि पंजाब यांच्यातील सामना बरोबरीत सुटला होता. दोन्ही संघांनी 8 विकेट्स गमावत 157 धावा केल्या होत्या. ज्यामुळे सुपर ओव्हर खेळावी लागली होती. सुपर ओव्हरमध्ये पंजाबने दिल्लीला विजयासाठी 3 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान दिल्लीने पार करत विजय मिळवला.
दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील हा रोमांचक सामना सुपर ओव्हरमध्ये पोहचणारा आयपीएल 2020 चा पहिला सामना ठरला. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना जिंकला आणि स्पर्धेतील पहिल्या विजयाची चव चाखली.
महत्त्वाच्या बातम्या-
-सनरायझर्सच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी; हा खेळाडू आयपीएलमधून होऊ शकतो बाहेर
-वॉर्नर, विलियम्सन, भुवनेश्वर म्हणतात आम्हीच होणार यंदाचा आयपीएल विजेता; हैदराबाद संघ मिळवणार…
-पहिल्याच सामन्यात विराटच्या बेंगलोरने मारली बाजी, १० धावांनी मिळवला दणदणीत विजय
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा ४ फलंदाज
-पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दिल्लीचे ‘हे’ ५ खेळाडू खेळले नसते तर काही खरं नव्हतं
-विराट कोहली-डेव्हिड वॉर्नरच्या संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन, पहा कुणाला मिळेल जागा