fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहिल्याच सामन्यात विराटच्या बेंगलोरने मारली बाजी, १० धावांनी मिळवला दणदणीत विजय

Royal Challengers Bangalore Won The Match By 10 Runs

September 22, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


आयपीएल २०२० च्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील तिसरा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेगंलोर विरुद्ध सनराइजर्स हैद्राबाद संघात पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअममध्ये खेळण्यात आलेल्या या सामन्यात बेंगलोरने १० धावांनी विजय मिळवला.

नाणेफेक जिंकून हैद्राबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाने ५ विकेट्स गमावत १६३ धावा केल्या. बेंगलोरने दिलेल्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैद्राबाद संघ १९.४ षटकात १५३ धावाच करु शकला.

हैद्राबादकडून फलंदाजी करताना सलामीला फलंदाजीला आलेला कर्णधार वॉर्नर दूसऱ्या षटकातच ६ धावा करत धावबाद झाला. पण जॉनी बेयरस्टो आणि मनिष पांडेने पुढे दमदार प्रदर्शन केले. पांडे ३३ चेंडूत ३४ धावा करत फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर यष्टीरक्षक फलंदाज बेयरस्टोलाही चहलनेच त्रिफळाचीत केले. त्यामुळे बेयरस्टो ४३ चेंडूत ६१ धावांची दमदार खेळी करत पव्हेलियनला परतला. यात त्याच्या ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

त्यांच्याव्यतिरिक्त प्रियम गर्गनेही १३ चेंडूच १२ धावा केल्या. पण हैद्राबादच्या उर्वरित खेळाडूंना पुढे २ आकडी धावसंख्यादेखील पार करता आली नाही. त्यामुळे हैद्राबादला १९.४ षटकात १५३ धावाच करता आल्या.

बेंगलोर संघाकडून गोलंदाजी करताना फिरकीपटू युझवेंद्र चहलने सर्वाधिक ३ विकेट्स चटकावल्या. त्याने ४ षटकात १८ धावा देत हा कारनामा केला. तर नवदिप सैनी आणि शिवम दुबे यांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. सैनीने ३.४ षटकात ३३ धावा देत तर दुबेने ३ षटकात १५ धावा देत हा पराक्रम केला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करण्यासाठी बेंगलोरचा कर्णधार विराटने ऍरॉन फिंच आणि देवदत्त पड्डीकलला फलंदाजीसाठी मैदानावर उतरवले. या धुरंदर फलंदाजांनी ११व्या षटकापर्यंत ९० धावांची भागिदारी केली. पुढे १०.६ षटकात विजय शंकरने पड्डीकलला (५६ धावा) त्रिफळाचीत करत सामन्यातील पहिली विकेट चटकावली. त्याच्यापाठोपाठ पुढील चेंडूवर फिंचदेखील पायचित होत पव्हेलियनला परतला.

पुढे संघाचा डाव सांभळण्यासाठी मैदानावर उतरले कर्णधार विराट आणि प्रमुख फलंदाज एबी डिविलयर्स. पण हैद्राबादच्या गोलंदाजांनी विराटला जास्त धावा करु दिल्या नाहीत. कोहली १३ चेंडूत १४ धावा करत बाद झाला. पण डिविलियर्सने ३० चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार मारत ५१ धावांची तूफानी खेळी केली. शेवटी २०व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मनिष पांडे आणि जॉनी बेयरस्टोने त्याला धावबाद केले. पुढे कुणालाही २ आकडी धावसंख्या पार करता आली नाही.

हैद्राबाकडून गोलंदाजी करताना टी नटराजन, विजय शंकर, अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट चटकावली.

महत्त्वाच्या बातम्या-

-अबब! या दोघांनी आयपीएलमध्ये एकाच संघासाठी मारलेत तब्बल २०० षटकार

-स्पर्धा कोणतीही असो; युवा पड्डीकल करतो धमाका, जाणून घ्या इतिहास

-आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा ४ फलंदाज

ट्रेंडिंग लेख-

-कसोटीत त्रिशतक, वनडेत द्विशतक व टी२०त शतक करणाऱ्या जगातील एकमेव क्रिकेटरचा आज आहे बड्डे

-आयपीएलच्या मागील ३ हंगामातील रोहित शर्माची कामगिरी, घ्या जाणून

-१३ वा आयपीएल हंगाम गाजवणार हे ३ भारतीय गोलंदाज, मिळणार सर्वाधिक बळी?


Previous Post

अबब! या दोघांनी आयपीएलमध्ये एकाच संघासाठी मारलेत तब्बल २०० षटकार

Next Post

वॉर्नर, विलियम्सन, भुवनेश्वर म्हणतात आम्हीच होणार यंदाचा आयपीएल विजेता; हैदराबाद संघ मिळवणार…

Related Posts

Photo Curtsey: Facebook/Khrievitso Kense
IPL

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ‘या’ पठ्ठ्याने जिंकल मुंबई इंडियन्सचं मन, गाजवणार आयपीएल २०२१चा हंगाम ?

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ englandcricket
क्रिकेट

स्मिथची शिकार केली आता जो रूटचा नंबर; भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकाचे इंग्लंडच्या कर्णधाराला आव्हान

January 28, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

कागिसो रबाडाचे कसोटी विकेट्सचे ‘द्विशतक’, दिग्गजांच्या मांदियाळीत मिळवली टॉप-५ मध्ये जागा

January 28, 2021
क्रिकेट

“अविवाहित खेळाडूंपेक्षा विवाहित खेळाडूंचे बायो-बबलमध्ये राहणे जास्त अवघड”, ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे भाष्य

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

“धोनीच्या ५ ते १० टक्के जरी खेळलो तरी विशेष आहे”, ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूची प्रतिक्रिया

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

आयपीएल २०२१ च्या हंगामात खेळताना दिसू शकतो अर्जून तेंडुलकर; लिलावासाठी ठरला पात्र

January 28, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ Sunrisers

वॉर्नर, विलियम्सन, भुवनेश्वर म्हणतात आम्हीच होणार यंदाचा आयपीएल विजेता; हैदराबाद संघ मिळवणार...

Photo Courtesy: Twitter/Sunrisers

सनरायझर्सच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी; हा खेळाडू आयपीएलमधून होऊ शकतो बाहेर

Photo Courtesy: Twitter/RCBTweets

आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात धमाकेदार अर्धशतकी खेळी करणारा हा युवा खेळाडू आहे तरी कोण?

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.