आयपीएलच्या १३व्या हंगामातील तिसरा सामना आज सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंलगोर संघात होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात हैद्राबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सुरुवातीला फलंदाजासाठी मैदानावर आलेल्या बेंगलोरने २० षटकात ५ विकेट्स गमावत १६३ धावा केल्या.
बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने ऍरॉन फिंच आणि देवदत्त पड्डीकलला सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरवले. या धुरंदर फलंदाजांनी ११व्या षटकापर्यंत ९० धावांची भागिदारी केली. पुढे १०.६ षटकात विजय शंकरने पड्डीकलला (५६ धावा) त्रिफळाचीत करत सामन्यातील पहिली विकेट चटकावली. त्याच्यापाठोपाठ पुढील चेंडूवर फिंचदेखील पायचित होत पव्हेलियनला परतला.
पुढे संघाचा डाव सांभळण्यासाठी मैदानावर उतरले कर्णधार विराट आणि प्रमुख फलंदाज एबी डिविलयर्स. पण हैद्राबादच्या गोलंदाजांनी विराटला जास्त धावा करु दिल्या नाहीत. कोहली १३ चेंडूत १४ धावा करत बाद झाला. पण डिविलियर्सने ३० चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार मारत ५१ धावांची तूफानी खेळी केली. शेवटी २०व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मनिष पांडे आणि जॉनी बेयरस्टोने त्याला धावबाद केले.
असे असले तरी, डिविलियर्सने या सामन्यातील त्याच्या २ षटकारांसह आयपीएल कारकिर्दीत बेंगलोर संघाकडून २०० षटकारांचा आकडा पार केला आहे. यासह तो बेंगलोरकडून सर्वाधिक षटकार मारणारा दूसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी या यादीत विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल हा अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्याने बेंगलोरकडून ८५ सामने खेळत सर्वाधिक २३९ षटकार मारेल आहेत.
तर विराट १७८ सामन्यात १९० षटकार मारत बेंगलोरकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. तसेच रॉस टेलर २२ सामन्यात ३१ षटकार ठोकत चौथ्या क्रमांकावर आहे.
बेंलगोरसाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
ख्रिस गेल – २३९ षटकार
एबी डिविलियर्स – २०१ षटकार
विराट कोहली – १९० षटकार
रॉस टेलर – ३१ षटकार
एकाच संघासाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
ख्रिस गेल – २३९ षटकार (बंगळुरू)
एबी डिविलियर्स – २०१ षटकार (बंगळुरू)
विराट कोहली – १९० षटकार (बंगळुरू)
एमएस धोनी- १७९ षटकार (चेन्नई)
कायरन पोलार्ड- १७७ षटकार (मुंबई)
महत्त्वाच्या बातम्या –
स्पर्धा कोणतीही असो; युवा पड्डीकल करतो धमाका, जाणून घ्या इतिहास
आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा ४ फलंदाज
विराटने घेतलेला ‘हा’ निर्णय पाहून दुश्मनही करेल त्याच कौतूक
ट्रेंडिंग लेख –
कसोटीत त्रिशतक, वनडेत द्विशतक व टी२०त शतक करणाऱ्या जगातील एकमेव क्रिकेटरचा आज आहे बड्डे
१३ वा आयपीएल हंगाम गाजवणार हे ३ भारतीय गोलंदाज, मिळणार सर्वाधिक बळी?
मुंबई इंडियन्स संघात असूनही कधीच खेळण्याची संधी न मिळालेले ६ स्टार खेळाडू