आयपीएलच्या १३व्या हंगामातील तिसरा सामना आज सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंलगोर संघात होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे हा सामना होत आहे. विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंलगोर संघाचे तर सनरायझर्स हैद्राबादचे नेतृत्त्व डेविड वॉर्नर करत आहे.
विशेष म्हणजे, विराटने भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील स्टार खेळाडू देवदत्त पड्डीकलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिल्यामुळे, त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे.
हैद्राबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकत या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बेंगलोरचे फलंदाज ऍरॉन फिंच आणि पड्डीकल सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. अशात पड्डिकलने दमदार फलंदाजी प्रदर्शन करत १०व्या षटकातच अर्धशतकी खेळी केली. पण पुढील षटकातील शेवटच्या चेंडूवर विजय शंकरने त्याला त्रिफळाचीत केले. त्यामुळे पड्डिकल ४२ चेंडूत ८ चौकारांसह ५६ धावा करत पव्हेलियनला परतला.
असे असले तरी, २० वर्षीय पड्डिकलने आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. एवढेच नव्हे तर, या धुरंदराने यापुर्वी खेळलेल्या जवळपास सर्व क्रिकेट स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक करण्याचा अनोखा आणि प्रशंसनीय विक्रम केला आहे. Devdutt Padikkal Best Ever Record Of Half Century On Debut
त्याने नोव्हेंबर-डिसेंबर २०१८मध्ये महाराष्ट्र संघाविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्या सामन्यातील दूसऱ्या डावात पड्डीकलने ७७ धावांची दमदार खेळी केली होती. यात त्याच्या ११ चौकांराचा आणि एका षटकाराचा समावेश होता.
तर सप्टेंबर २०१९ ला विजय हजारे ट्रॉफीतील झारखंडविरुद्धच्या सामन्यातून त्याने ‘अ’ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यावेळी त्याने सलामीला फलंदाजी करत अर्धशतक केले होते. त्याने ८३ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या होत्या. याबरोबरच नोव्हेंबर २०१९मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यातून पड्डीकलने टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यावेळीही त्याने ३३ चेंडूत नाबाद ५३ धावांची अफलातून खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा ४ फलंदाज
विराटने घेतलेला ‘हा’ निर्णय पाहून दुश्मनही करेल त्याच कौतूक
पराभवानंतर खेळाडूंसह संघ मालकिणही भडकली; पहा काय उचलले पाऊल
ट्रेंडिंग लेख –
पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दिल्लीचे ‘हे’ ५ खेळाडू खेळले नसते तर काही खरं नव्हतं
कसोटीत त्रिशतक, वनडेत द्विशतक व टी२०त शतक करणाऱ्या जगातील एकमेव क्रिकेटरचा आज आहे बड्डे
१३ वा आयपीएल हंगाम गाजवणार हे ३ भारतीय गोलंदाज, मिळणार सर्वाधिक बळी?