---Advertisement---

बटलरचं शतक अन् चहलच्या ‘पंचका’ने उचलला राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा; कोलकाताला चारली ७ धावांनी धूळ

On: सोमवार, एप्रिल 18, 2022 11:53 PM
Rajasthan-Royals
---Advertisement---

सोमवारी (दि. १८ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स संघात इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ३०वा सामना ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडला. हा सामना राजस्थानने ७ धावांनी खिशात घातला. हा राजस्थानचा हंगामातील चौथा विजय होता. या विजयाचा शिल्पकार जोस बटलर ठरला. बटलर, युझवेंद्र चहल आणि ओबेद मॅककॉय हे राजस्थान संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. चहलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

नाणेफेक जिंकून कोलकाताचा गोलंदाजीचा निर्णय
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत २१७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघ सर्वबाद २१० धावाच करू शकला.

बटलरच्या षटकाराचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोलकाताच्या कर्णधाराचे अर्धशतक व्यर्थ
कोलकाताकडून फलंदाजी करताना कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार खेळी केली. त्याने ५१ चेंडूंचा सामना करताना ८५ धावा केल्या. यामध्ये ४ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. मात्र, त्याचे हे अर्धशतक व्यर्थ ठरलं. श्रेयसव्यतिरिक्त सलामीवीर ऍरॉन फिंचनेही अर्धशतकी खेळी केली. त्याने २८ चेंडूंचा सामना करताना ५८ धावा चोपल्या. यामध्ये २ षटकार आणि ९ चौकारही सामील आहेत. याव्यतिरिक्त उमेश यादवने २१ धावांचे योगदान दिले. यादव सामना जिंकवेल असे वाटत होते. मात्र, संघाला सामना जिंकून देण्यात तो अपयशी ठरला. तसेच, नितीश राणाने १८ धावांचे योगदान दिले होते.

https://twitter.com/IPL/status/1516118828610392066

यावेळी राजस्थानकडून गोलंदाजी करताना युझवेंद्र चहल चमकला. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ४० धावा देत सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तसेच, ओबेद मॅककॉयने ३.४ षटके गोलंदाजी करताना ४१ धावा देत २ विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त प्रसिद्ध कृष्णा आणि आर अश्विनने प्रत्येकी एक विकेट खिशात घेतली.

जोस बटलरचे खणखणीत शतक
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून जोस बटलर उजवा ठरला. बटलरने ६१ चेंडूंचा सामना करताना १०३ धावा कुटल्या. या धावा करताना त्याने ५ षटकार आणि ९ चौकारांचीही बरसात केली. पुढे कर्णधार संजू सॅमसनने ३८ धावांचे योगदान दिले. तसेच, शिमरॉन हेटमायरने २६ आणि देवदत्त पडिक्कलने २४ धावा चोपल्या. याव्यतिरिक्त इतर फलंदाज फार काही खास कामगिरी करू शकले नाहीत. पण संघाने २०० धावसंख्येचा आकडा मात्र पार केला.

यावेळी कोलकाताकडून गोलंदाजी करताना सुनील नारायणने सर्वाधिक विकेट्स आपल्या खिशात घातल्या. त्याने २ षटके गोलंदाजी करताना २१ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त पॅट कमिन्सने १ आणि आंद्रे रसेलने १ विकेट आपल्या नावावर केली.

या विजयासह राजस्तान संघाने गुणतालिकेत थेट दुसरे स्थान गाठले आहे. त्यांचे ८ गुण आहेत. दुसरीकडे, कोलकाता संघ ६ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानी घसरला आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

कोलकाताच्या वेगवान गोलंदाजाविरुद्ध बटलरचा खणखणीत षटकार; १०० मीटर दूर जाऊन पडला चेंडू

इकडं सामना खेळत होता विंडीजचा विश्वविजेता खेळाडू, तिकडं पठ्ठ्याची गाडीच गेली चोरीला, पदार्पणातच ‘गोल्डन डक’

आयपीएलप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! कोरोना पॉझिटिव्ह मिशेल मार्शचा आरटी- पीसीआर रिपोर्ट आला

तोडफोड गोलंदाजी! लॉकी फर्ग्युसनने टाकला खतरनाक यॉर्कर, तुटली अंबाती रायुडूची बॅट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---