इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी (दि. २७ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळला गेला. या सामन्यात राजस्थान संघाने बेंगलोर संघाला ७ विकेट्सने पराभूत केले. या विजयासह राजस्थान संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आता त्यांना पहिल्या क्वालिफायर सामन्यात ज्या संघाने मात दिली होती, त्या गुजरात टायटन्स संघाविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे. क्वालिफायर २ सामन्यात जोस बटलर याने राजस्थानच्या विजयात मोलाचे योगदान दिले. बटलरला त्याच्या शतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले.
या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय चुकीचा ठरवण्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाच्या खेळाडूंना अपयश आले. बेंगलोर संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत १५७ धावा चोपल्या. या धावांचे आव्हान राजस्थानने १८.१ षटकात ७ विकेट्स शिल्लक ठेवत पूर्ण केले.
https://twitter.com/rajasthanroyals/status/1530241474398687232
Qualifier 2. Rajasthan Royals Won by 7 Wicket(s) (Qualified) https://t.co/orwLrIsyMD #Qualifier2 #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2022
राजस्थानकडून फलंदाजी करताना जोस बटलर (Jos Buttler) चांगलाच चमकला. त्याने ६० चेंडूत नाबाद १०६ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने ६ षटकार आणि १० चौकारांचाही पाऊस पाडला. याव्यतिरिक्त कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) यानेही चांगली खेळी केली. त्याने २३ धावांचे योगदान दिले, तर सलामीवीर यशस्वी जयसवाल (Yashaswi Jaiswal) यानेही २१ धावा चोपल्या.
यावेळी बेंगलोरकडून गोलंदाजी करताना जोश हेजलवूड याने २ विकेट्स घेतल्या. तसेच, वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाकडून धावा करताना रजत पाटीदार (Rajat Patidar) अव्वलस्थानी राहिला. त्याने ४२ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. त्याच्या या अर्धशतकी खेळीत ३ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त फक्त फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनाच २० धावांचा आकडा पार करता आला. फाफने २५ धावा, तर मॅक्सवेल याने २४ धावांचे योगदान दिले. माजी कर्णधार विराट कोहली याला फक्त ७ धावांवर समाधान मानावे लागले.
यावेळी राजस्थानकडून गोलंदाजी करताना प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) आणि ओबेद मॅकॉय (Obed McCoy) यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. कृष्णाने ४ षटके गोलंदाजी करताना २२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच, मॅकॉय यानेही ४ षटकात २३ धावा देत ३ विकेट्स घेण्याची किमया केली. या दोघांव्यतिरिक्त आर अश्विन आणि ट्रेंट बोल्ट या गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
आता या विजयानंतर राजस्थान संघ रविवारी (दि. २९ मे) गुजरात टायटन्स संघाविरुद्ध आयपीएल २०२२मधील अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे पार पडेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VELvsTRL। स्म्रीती मंधानाने घेतला दीप्ती शर्माचा कठीण झेल, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी!’
कन्फर्म! पुढच्या हंगामात मुंबई करणार ‘या’ ४ खेळाडूंना ‘जय महाराष्ट्र?’
काय आहे राजस्थानविरुद्धचा मास्टरप्लॅन? वाचा काय म्हणाला आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस