---Advertisement---

धोनी-रैनाच्या विक्रमाचा पाठलाग करतोय यशस्वी! केकेआरला चोपत जडेजाला सोडले मागे

On: शुक्रवार, मे 12, 2023 9:54 AM
---Advertisement---

यशस्वी जयस्वाल याच्या 98 धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा आयपीएल 2023 चा 56 वा सामना 9 विकेट्सने जिंकला. या विजयासह राजस्थानने हंगामातील सहावा विजय मिळवत गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. या सामन्यादरम्यान जयस्वालने अवघ्या 13 चेंडूत आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. त्याच्या नाबाद खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्याबरोबर त्याने या हंगामात सर्वाधिक सामनावीर  पुरस्कार मिळवण्याच्या बाबतीत चेन्नईच्या रवींद्र जडेजा याला मागे सोडले. त्यानंतर आता त्याची नजर एमएस धोनी व सुरेश रैना यांच्या विक्रमावर लागली आहे.

अगदी पहिल्या चेंडूपासून यशस्वी जयस्वाल केकेआर च्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. त्याचे शतक 2 धावांनी हुकले. त्याने 47 चेंडूत 5 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने नाबाद 98 धावा केल्या. त्याने यावेळी 13.1 षटकात संघाला शानदार विजय मिळवून दिला. या लाजवाब खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

चालू हंगामात चार वेळा सामनावीर पुरस्कार जिंकणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. त्याने याआधी दिल्ली, मुंबई व चेन्नई विरुद्धच्या सामन्यात सामनावीर पुरस्कार आपल्या नावे केलेला. त्यानंतर रवींद्र जडेजाने आत्तापर्यंत तीन वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

एका आयपीएल हंगामात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम हा एबी डिव्हिलियर्स व ख्रिस गेल यांच्या नावे आहेत. डिव्हिलियर्स याने 2016 मध्ये बेंगलोर साठी खेळताना, तर गेलने 2018 मध्ये पंजाब साठी खेळताना प्रत्येकी सात वेळा सामनावे पुरस्कारावर मोहोर उमटवली होती. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर याने 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी, सुरेश रेनाने 2013 मध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी व एमएस धोनी याने 2010 मध्ये प्रत्येकी सहा वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला होता.

(Rajasthan Royals Yashasvi Jaiswal Won Fourth Man Of The Match In IPL 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लय भारी! ऑस्कर विजेत्या The Elephant Whisperers टीमला भेटला धोनी, गिफ्ट म्हणून दिली ‘ही’ खास वस्तू
‘त्यांनी मला फोन करून…’, खराब फॉर्ममध्ये असताना टीका करणाऱ्यांबद्दल नितीश राणाचा धक्कादायक खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---