आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (27 एप्रिल) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना खेळला गेला. राजस्थानने दोन पराभवानंतर पुन्हा एकदा दर्जेदार खेळ करत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. चांगल्या सुरुवातीनंतर राजस्थानची धावसंख्या मधल्या षटकांमध्ये काहीशी थांबली होती. त्यावेळी या हंगामात पदार्पण केलेल्या ध्रुव जुरेल याने पुन्हा एकदा आपला फिनिशर अवतार दाखवत संघाला 200 पार नेण्यात सिंहाचा वाटा उचलला.
राजस्थानला या सामन्यात जोस बटलर व यशस्वी जयस्वाल यांनी 8.2 षटकात 86 धावांची सलामी दिली होती. त्यानंतर मात्र राजस्थानचे तीन गडी नियमित अंतराने बाद झाले. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ध्रुवने अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्यास सुरुवात केली. अखेरच्या षटकात धावबाद होण्यापूर्वी त्याने 15 चेंडूवर 34 धावांची वेगवान खेळी केली. यामध्ये तीन चौकार व दोन षटकारांचा समावेश होता.
मागील वर्षी राजस्थान नेत्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. मात्र, यावेळी पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्या सामन्यात त्याने 15 चेंडूंवर 32 धावांची नाबाद खेळी केलेली. त्यानंतरही संघाला गरज असेल तेव्हा तो चौकार षटकार मारताना दिसला. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात देखील त्याने 16 चेंडूंमध्ये नाबाद 34 धावा चोपल्या होत्या. सध्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट असणाऱ्या खेळाडूंमध्ये तो पहिल्या तिघांत येतो. त्याने आतापर्यंत 66 चेंडूंचा सामना करताना 130 धावा केल्या आहेत.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करणारा ध्रुव यष्टीरक्षक तसेच सलामी फलंदाज आहे. मात्र, राजस्थानसाठी फिनिशरची भूमिका बजावताना त्याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
(Rajasthan Royals Young Prodigy Dhruv Jurel Making His Mark In IPL 2023 As Finisher)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“रोहित मानसिकदृष्ट्या थकलाय”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितली हिटमॅनची परिस्थिती
रॉयल्सचा किल्ला भेदण्यात सीएसके पुन्हा अपयशी! शानदार विजयासह राजस्थान पुन्हा नंबर वन