आयपीएल 2025 साठी नुकताच मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता. ज्यात आरसीबीने 22 खेळाडूंसह आपला संघ पूर्ण केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लिलावादरम्यान फाफ डू प्लेसिसला आपल्या संघाचा भाग बनवले नाही. गेल्या तीन मोसमात फॅफने आरसीबीचे नेतृत्व केले होते. विराट कोहलीच्या जागी त्याला कर्णधार बनवण्यात आले होते. विराटने 2021 नंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडले. अशा परिस्थितीत आगामी मोसमात आरसीबीचे कर्णधार कोण? याचा निर्णय होणे बाकी आहे. दरम्यान, एका युवा स्टार खेळाडूने आरसीबीच्या कर्णधारपदासाठी दावा केला आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून रजत पाटीदार आहे.
काही खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत. ज्यामध्ये इंग्लंडचा खेळाडू फिल सॉल्टच्या नावाचाही समावेश आहे. त्याने अलीकडे जोस बटलरच्या अनुपस्थितीत मर्यादित क्रिकेटच्या फाॅरमॅटमध्ये इंग्लंडचे कर्णधारपद भूषवले आहे. आरसीबी संघ एका युवा स्टारच्या शोधात असेल जो त्यांच्या संघाचे दीर्घकाळ नेतृत्व करू शकेल. दरम्यान, रजत पाटीदारनेही आपण आरसीबीचा कर्णधार होऊ शकतो हे सिद्ध केले आहे. कर्णधार म्हणून त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
रजत पाटीदारने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये मध्य प्रदेश संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मध्यप्रदेश संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. संघ 13 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. याशिवाय कर्णधार म्हणून रजत पाटीदार संपूर्ण स्पर्धेत मैदानावर खूप सक्रिय दिसला. पाटीदारने कर्णधार म्हणून 15 टी20 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 12 सामने जिंकले आहेत. यावेळी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अनेक मोठे खेळाडू खेळत होते. त्या खेळाडूंमध्ये पाटीदारने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा परिस्थितीत आरसीबीचे कर्णधारपद स्वीकारण्यासाठी पाटीदार हा सर्वात मोठा दावेदार बनला आहे. त्याला यावर्षी आरसीबी संघाने रिटेन केले आहे.
हेही वाचा-
ब्रेंडन मॅक्युलमचा विक्रम मोडीत, किवी कर्णधाराने रचला इतिहास
ज्युनियर आशिया कपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाचा प्रवेश, विजेतेपदासाठी या संघाशी सामना
गाबा कसोटीदरम्यान मोहम्मद शमीबाबत मोठी अपडेट, लवकरच संघाकडून खेळणार