IND vs BAN, Test Series: श्रीलंका दौरा संपल्यापासून भारतीय संघ ब्रेकवर आहे. आता भारतीय संघ पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहे. बांगलादेश भारत दौऱ्यावर दोन कसोटी आणि तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळते? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याचबरोबर एक खेळाडू असाही आहे, ज्याचे मालिकेतून बाहेर पडणे जवळपास निश्चित आहे. आपण ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे रजत पाटीदार (Rajat Patidar).
31 वर्षीय खेळाडूची गणना मोठे फटके मारणाऱ्या शक्तिशाली फलंदाजांमध्ये केली जाते. रजतची स्थानिक क्रिकेटमधील आकडेवारीही खूपच प्रभावी आहे. रजतला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, उजव्या हाताचा खेळाडू त्या संधीचा फायदा उठवण्यात पूर्णपणे अपयशी ठरला.
रजतने तीन सामन्यांच्या 6 डावात फलंदाजी करताना केवळ 63 धावा केल्या होत्या. या खराब कामगिरीमुळे तो खूप ट्रोल झाला होता. आता पाटीदारला आणखी एक संधी देण्याची चूक बीसीसीआय करणार नाही. कारण सध्या भारतीय संघाकडे चांगल्या यष्टीरक्षक फलंदाजांचे पर्यायही उपलब्ध आहेत.
जयस्वाल आणि गिलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा
टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची मागील कसोटी मालिका 4-1 ने जिंकली होती. या मालिकेत यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते. भारतीय संघ आणि चाहते पुन्हा एकदा या दोन युवा फलंदाजांकडून तशाच कामगिरीची अपेक्षा करतील.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपले अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी भारतीय संघाला मालिकेतील दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. दुसरीकडे बांगलादेश संघाला भारताविरुद्ध ताकद दाखवायची आहे. बांगलादेशच्या बहुतांश खेळाडूंना भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचा पुरेसा अनुभव आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटीमध्ये पुनरागमन करण्यासाठी पंतला द्यावी लागणार अग्नीपरिक्षा, ‘या’ देशांतर्गत स्पर्धेत मिळणार टक्कर
“दोन चार कपडे काढले असते तर वजन…”, विनेश फोगटबद्दल भाजप नेत्याची संतापजनक पोस्ट
‘हा’ दिग्गज खेळाडू 12 वर्षांनंतर प्रथमच खेळणार देशांतर्गत क्रिकेट!