भारतीय संघ सध्या न्य़ूझीलंडविरूद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. दरम्यान भारताचा प्रतिभावान युवा खेळाडू रजत पाटीदारने (Rajat Patidar) रणजी ट्राॅफीमध्ये (Ranji Trophy) वेगवान शतक झळकावले आणि इतिहास रचला.
हरियाणाविरूद्धच्या सामन्यात रजत पाटीदारने (Rajat Patidar) 159 धावांची तुफानी खेळी खेळली. दरम्यान त्याने 102 चेंडूंचा सामना केला. 159 धावांच्या खेळीत त्याने 13 चौकारांसह, 7 उत्तुंग षटकार ठोकले. त्याच्या या खेळीमुळे मध्य प्रदेश संघाने दुसऱ्या डावात 4 गडी बाद 308 धावांवर डाव घोषित केला आणि हरियाणासमोर 177 धावांचे आव्हान उभारले.
आतापर्यंतच्या रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा रजत पाटीदार (Rajat Patidar) पाचवा फलंदाज ठरला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा रेकाॅर्ड रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नावावर आहे 2016-17 मध्ये झारखंडविरूद्धच्या सामन्यात पंतने 48 चेंडूत शतक ठोकले होते.
रणजी ट्रॉफीतील सर्वात वेगवान शतक-
रिषभ पंत- 48 चेंडू (2016/17)
रियान पराग- 56 चेंडू (2023/24)
आरके बोरा- 56 चेंडू (1987/88)
एस रुबेन पॉल- 60 चेंडू (1995/96)
रजत पाटीदार- 68 चेंडू (2024-25)
रजत पाटीदारच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 2024 मध्ये इंग्लंडविरूद्धच्या कसोटीत पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने 3 कसोटी सामने खेळले. दरम्यान त्याने 10.50च्या सरासरीने फलंदाजी करताना 63 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याची सर्वोच्च धावसंख्या 32 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; तिसऱ्या सामन्यासाठी ‘या’ स्टार खेळाडूची भारतीय संघात एँट्री!
पुनरागमन करताच वॉशिंग्टन सुंदरची किंमत वाढली, हे तिन्ही संघ करोडोंचा खर्च करायला तयार!
IND vs NZ; मुंबईत रवींद्र जडेजा इतिहास रचणार, या दिग्गज खेळाडूंना मागे सोडणार