---Advertisement---

रजत पाटीदारचे दमदार द्विशतक, लवकरच होणार भारतीय संघात एन्ट्री!

On: शुक्रवार, ऑक्टोबर 17, 2025 8:34 PM
---Advertisement---

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार एकामागोमाग एक दमदार कामगिरी करून सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. मध्य प्रदेशचा कर्णधार बनल्यानंतर रजत पाटीदार फलंदाजीने धुमाकुळ घालतोय. रणजी ट्रॉफी 2025 च्या सुरुवातीलाही रजतने आपल्याच शैलीत धमाकेदार कामगिरी केली आहे. पंजाबविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात त्याने जबरदस्त द्विशतक झळकावले.

332 चेंडूंचा सामना करत रजतने 205 धावा ठोकल्या असून तो अजूनही क्रीजवर टिकून आहे. रजतच्या या शानदार खेळीच्या जोरावर मध्य प्रदेश अतिशय मजबूत स्थितीत आहे आणि संघाने 500 धावांचा टप्पा पार केला आहे.

पंजाबने केलेल्या 232 धावांच्या प्रत्युत्तरात मध्य प्रदेशची सुरुवात काही खास झाली नाही. संघाने अवघ्या 98 धावांवर तीन गडी गमावले. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदार मैदानात उतरला. रजतने येताच डाव सावरण्याची जबाबदारी घेतली आणि शुभम शर्मा सोबत चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. शुभम बाद झाल्यानंतर रजतला वेंकटेश अय्यरची चांगली साथ मिळाली आणि दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 147 धावांची भागीदारी उभारली. वेंकटेश 73 धावा करून बाद झाला.

रजत एका टोकाला ठामपणे उभा राहिला आणि शतकानंतर त्याने आपले द्विशतकही पूर्ण केले. 205 नाबाद धावांच्या खेळीत रजतने आतापर्यंत तब्बल 26 वेळा चेंडू सीमारेषेपार पाठवला आहे. कर्णधाराच्या या अप्रतिम खेळीच्या जोरावर मध्य प्रदेश संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 8 गडी गमावून 519 धावा केल्या आहेत. रजतसोबत अरशद खानही 60 धावा करून त्याला उत्तम साथ देत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---