भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना शुक्रवारी (17 मार्च) आयोजित केला गेला. उभय संघांतील हा पहिला वनडे सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जात आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत भारताने विजय मिळवला आहे. अशात वनडे मालिका जिंकण्यासाठी पाहुणा संघ शक्य ते सर्व प्रयत्न करेल. पहिल्या वनडे सामन्याला चाहच्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थितीत दर्शवली. यामध्ये साउथ सुपरस्टार रजनीकांत यांचाही समावेश होता.
वनडे मालिकेतील हा पहिला सामना मुंबईत खेळला जात आहे. असात रजनीकांत (Rajinikanth) सामन्यासाठी उपस्थित असल्याची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएच्या (MCA) अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केली गेली. एमसीएच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून जे फोटो शेअर केले गेले आहेत, त्यात रजनीकांत यांच्यासोबत एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे (Amol Kale) दिसत आहेत.
Thalaiva in the house 😎
The President of Mumbai Cricket Association, Mr. @Amolkk1976 in conversation with the Superstar @rajinikanth during the #INDvAUS game at the Wankhede 🫶#MCA #Mumbai #Cricket #IndianCricket #Wankhede #BCCI pic.twitter.com/lvgmfL2gsp
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) March 17, 2023
ऑ्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या वनडे सामन्याआधी रजनीकांत आणि भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन यांची देखील भेट झाली होती. सॅमसनने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून थलायवा (Thalaiwa) रजनीकांतसोबतचा फोटो शेअर केला. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सॅमसनने लिहिले की, “7 वर्षांचा असताना मी माझ्या पालकांना सांगितले होते, एक दिवस मी रजनीकांत सरांनी सरांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी जाईल. आज 21 वर्षांनंतर तो दिवस आला, जेव्हा थलायवाने मला घरी आमंत्रित केले.”
https://www.instagram.com/reel/CpsfeSGDgar/?utm_source=ig_web_copy_link
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – शुबमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया – ट्रेविस हेड, मिचले मार्श, स्टीव स्मिथ, मार्नल लाबुशेन, कॅमरून ग्रीन, जोस इंगलिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, शॉन एबॉट, मिचेल स्टार्क, एडम झंपा.
(Rajinikanth was present at the stadium for the first ODI between India and Australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी सुरेश रैना आहे, शाहिद आफ्रिदी नाही’, रैनाने का उडवली पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची खिल्ली?
हार्दिक पंड्याने केला शुभारंभ! ‘या’ तगड्या प्लेइंग इलेव्हनसह उतरणार मैदानात