Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अर्रर्र! आधीच महत्त्वाचे खेळाडू नसताना कांगारुंचा आणखी एक क्रिकेटर मालिकेतून बाहेर, आता कसं होणार?

अर्रर्र! आधीच महत्त्वाचे खेळाडू नसताना कांगारुंचा आणखी एक क्रिकेटर मालिकेतून बाहेर, आता कसं होणार?

March 17, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Glenn-Maxwell

Photo Courtesy: Twitter/cricketcomau


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (दि. 17 मार्च) खेळला जाणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार हार्दिक पंड्या याने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. पाहुण्या संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मालिकेतून बाहेर झाला आहे. याची माहिती नाणेफेकीवेळी प्रभारी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने दिली.

कोण आहे तो खेळाडू?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) वनडे मालिकेतून बाहेर पडलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू इतर कुणी नसून ऍलेक्स कॅरे (Alex Carey) आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने नाणेफेकीवेळी बोलताना सांगितले की, “आम्ही प्रथम फलंदाजीसाठी तयार आहोत. ऍलेक्स कॅरे आजारी आहे. त्यामुळे त्याच्या जागी जोश इंग्लिस हा खेळत आहे.” पुढे बोलताना त्याने म्हटले की, “डेविड वॉर्नर अजून पूर्ण फिट नसल्यामुळे त्याच्या जागी मिचेल मार्श सलामीला फलंदाजी करताना दिसेल.”

सामन्यात दोन्ही प्रभारी कर्णधार
पहिल्या वनडे सामन्यात दोन्ही संघांचे नेतृत्व प्रभारी कर्णधाराकडे आहे. रोहित शर्मा कौटुंबिक कारणांमुळे पहिल्या वनडेत खेळणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्याकडे आहे. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) हादेखील कौटुंबिक कारणांमुळे मालिकेतून बाहेर आहे. त्यामुळे त्याच्या जागी संघाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथ करत आहे. (cricketer Alex Carey has been ruled out of the ODI series against India due to illness)

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत-
शुबमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी,

ऑस्ट्रेलिया-
ट्रेविस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, सीन ऍबॉट, मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी सुरेश रैना आहे, शाहिद आफ्रिदी नाही’, रैनाने का उडवली पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची खिल्ली?
ब्रेकिंग! IND vs AUS वनडे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच माजी कर्णधाराची अचानक निवृत्ती


Next Post
Rajinikanth

सामना भारत-ऑस्ट्रेलियाचा पण मैफील लुटली थलायवा रजनीकांतने, वानखडेतील तो फोटो जोरदार व्हायरल

Rohit-Sharma

Video: पहिला वनडे सामना सोडून मेव्हण्याच्या लग्नात रोहितने लावले ठुमके, पत्नी रितिकानेही दिली साथ

Mohammad Siraj Travis Head

जगातल्या नंबर 1 गोलंदाजापुढे ट्रेविस हेड क्लीन बोल्ड! व्हिडिओ व्हायरल

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143