---Advertisement---

रक्षाबंधन विशेष: तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे त्यांच्या बहिणींबरोबरच पाहा गोड फोटो

On: रविवार, ऑगस्ट 22, 2021 5:04 PM
---Advertisement---

श्रावण महिन्यातील पौर्णिमाला रक्षाबंधनाचा सण भारतभरात साजरा करण्यात येतो. भावा-बहिण्याच्या गोड, प्रेमळ नात्याचा म्हणून हा सण ओळखला जातो. यंदा रविवारी (२२ ऑगस्ट) रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. दरम्यान, भारताचे अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावरुन आपल्या भावा-बहिणींचे गोड फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचे अनेक क्रिकेटपटू सध्या त्यांच्या घरी नाहीत. काही क्रिकेटपटू इंग्लंड दौऱ्यावर आहेत. तर काही क्रिकेटपटू आपल्या आयपीएल संघासह युएईमध्ये आहेत. त्यामुळे अशा खेळाडूंनी सोशल मीडियाचा वापर करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर, जे खेळाडू घरी आहेत, त्यांनी बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतरचे फोटो शेअर केले आहेत.

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर इशांत शर्माने त्याच्या बहिणींचे फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. श्रेयस अय्यरने त्याची बहिण श्रेष्ठाबरोबरचा एक फोटो शेअर करत तिला रक्षाबंधनाच्या दुबईहून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट यांनीही आपल्या बहिणींबरोबर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या.

https://www.instagram.com/p/CS3yb5Wsp-d/

याशिवाय आयपीएलमधील संघांनी त्यांच्या संघातील खेळाडूंचेही त्यांच्या बहिणींबरोबरचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत.

https://twitter.com/mipaltan/status/1429318718610235393

 

सध्या भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. तर, आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम युएईला १९ सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याने चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघातील खेळाडू तिकडे पोहचले आहेत. त्याचबरोबर अन्य संघही लवकरच युएईमध्ये दाखल होतील.

महत्त्वाच्या बातम्या – 

रक्षाबंधन विशेष: तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे त्यांच्या बहिणींबरोबरच पाहा गोड फोटो

आरारारा खतरनाक! चेन्नई सुपर किंग्जची सुपर डुपर बस दुबईत सज्ज, आता प्रतिक्षा फक्त…

मुंबई इंडियन्सच्या सरावाचा श्रीगणेशा, ५५ सेंकदाचा व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---