fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारताच्या रामकुमार रामनाथन, पुरव राजा जोडीचा उपांत्यपुर्व फेरीचा सामना लिअँडर पेस, मॅथ्यू एबडन यांच्याशी

पुणे। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन (एमएसएलटीए) च्या वतीने व महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आयोजित आयोजित तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत झेकियाच्या बिगर मानांकीत जिरी वेस्ली याने इटलीच्या सातव्या मानांकीत साल्वाटोर कारुसो याचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. लिथुआनियाच्या दुस-या मानांकीत रिकार्डस बेरँकीस याने जर्मनीच्या सेड्रिक-मार्सेल स्टीब याचा पारभव करत स्पर्धेच्या तिस-या फेरीत प्रवेश केला.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुहेरी गटात 1 तास 24 मिनिट चाललेल्या सामन्यात वाईल्डकार्ड प्राप्त जोडी भारताच्या लिअँडर पेसने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडन याच्या साथीत भारताच्या दिविज शरण व न्यूझीलंडच्या आर्टेम सितक या जोडीचा 6-2, 7-6(5) पराभव करत दुहेरीच्या दुस-या फेरीत प्रवेश केला. पहिला सेट 6-2 असा एकटर्फी जिंकल्यानंतर दुस-या सेटमध्ये बाराव्या गेमपर्यंत सामना 6-6 असा बोरोबरीत राहिल्याने टायब्रेक झाला. लिअँडर पेस व मॅथ्यू एबडन जोडीने गतिवान खेळाचे प्रदर्शन करत टायब्रेक 7-6(5) असा जिंकून सामन्यात विजय मिळवत स्पर्धेत आगेकुच केली.

भारताच्या रामकुमार रामनाथन व पुरव राजा या जोडीने भारताच्या सुमित नागल व बेलारूसच्या एगोर गेरासीमोव यांचा 7-6(6), 6-3 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

एकेरीच्या दुस-या फेरीतील सामन्यात 1 तास 42 मिनिट चाललेल्या सामन्यात लिथुआनियाच्या दुस-या मानांकीत जागतिक क्रमांक 73 असलेल्या रिकार्डस बेरँकीस याने जर्मनीच्या सेड्रिक-मार्सेल स्टीब याचा 7-6(2), 6-1 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्या सेटमध्येच सेड्रिक याने 29 वर्षीय रिकार्डसची सर्व्हिस ब्रेक केली. तिस-या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत चौथ्या गेममध्ये रिकार्डसने सेड्रिकची सर्व्हिस ब्रेक करत सामना २-२ असा बरोबरीत आणला. सहाव्या गेमअखेर सामना ३-३ असा बरोबरीत असताना सातव्या गेममध्ये सेड्रिक याने रिकार्डसची सर्व्हिस ब्रेक करत ४-३ अशी आघाडी घेतली. पुन्हा नवव्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत दहाव्या गेममध्ये रिकार्डसने सेड्रिकची सर्व्हिस ब्रेक करत सामना ५-५ असा बरोबरीत आणला. बाराव्या गेमअंती सामना ६-६ असा बरोबरीत झाल्याने टायब्रेक झाल. टायब्रेकमध्ये रिकार्डसने आक्रमक पवित्रा घेत टायब्रेक 7-6(2) असा जिंकत पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. दुस-या सेटमध्ये रिकार्डसने तिस-या, पाचव्या व सातव्या गेममध्ये सेड्रिकची सर्व्हिस ब्रेक करत दुसरा सेट 6-1 असा सहज जिंकत सामन्यात विजयासह उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

1 तास 42 मिनिट चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमांक107 असलेल्या 26 वर्षीय झेकियाच्या बिगर मानांकीत जिरी वेस्ली याने जागतिक क्रमांक98असलेल्या 27 वर्षीय इटलीच्या सातव्या मानांकीत साल्वाटोर कारुसो याचा 7-6(5), 6-4 असा पारभव करत खळबळजनक निकालाची नोंद करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

एकेरी गटातील पहिल्या फेरीच्या सामन्यात जपानच्या तारो डॅनियल याने 1 तास 40 मिनिट चाललेल्या सामन्यात भारताच्या वाईल्डकार्डप्राप्त ससी कुमार मुकुंद याचा 6-2, 7-6(7) असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

दुहेरीच्या उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू लिअँडर पेस ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडन याच्या साथीत भारताची जोडी रामकुमार रामनाथन व पुरव राजा यांच्याशी खेळणार आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल-

एकेरी गट- पहिली फेरी

तारो डॅनियल (जपान) वि.वि ससी कुमार मुकुंद (भारत) 6-2, 7-6(7)

दुसरी फेरी

रिकार्डस बेरँकीस (लिथुआनिया)(2) वि.वि सेड्रिक-मार्सेल स्टीब (जर्मनी) 7-6(2), 6-1
जिरी वेस्ली (झेकिया) वि.वि साल्वाटोर कारुसो (इटली)(7) 7-6(5), 6-4

दुहेरी गट- पहिली फेरी

लिअँडर पेस (भारत) / मॅथ्यू एबडन (ऑस्ट्रेलिया) वि.वि आर्टेम सितक (न्यूझीलंड) / दिविज शरण (भारत)(2) 6-2, 7-6(5)
रॉबर्ट लिंडस्टेड (स्वीडन) / रॉबिन हास (नेदरलँड्स) (1) वि.वि सँडर अरेन्ड्स (नेदरलँड्स) / डेव्हिड पेल (नेदरलँड्स) 6-7(5), 6-3, 10-8
जोनाथन एर्लिच (इस्त्राईल) / आंद्रे वासिलेव्हस्की (बेलारूस) (3) वि.वि डेव्हिड पेल (नेदरलँड्स) / मॅट रीड (ऑस्ट्रेलिया)4-6, 6-3,10-8
रामकुमार रामनाथन (भारत) / पुरव राजा (भारत) वि .वि सुमित नागल (भारत) / एगोर गेरासीमोव (बेलारूस) 7-6(6), 6-3

You might also like