क्रिकेटच्या मैदानावर कधीकधी असे झेल घेतले जातात, जे पाहून आपला डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. हे झेल अनेकदा सामन्याची दिशा पूर्णपणे बदलतात.
सध्या देशात आयपीएल 2024 ची धूम आहे. हंगामातील 28वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झाला. कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ramया सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पॉवरप्ले केकेआरच्या नावावर राहिला. लखनऊनं पहिल्या पाच षटकांतच दोन गडी गमावले होते. या सामन्यात केकेआरचा युवा खेळाडू रमणदीप सिंगनं एक शानदार झेल घेतला, ज्याचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. रमणदीप सिंगनं दीपक हुडाचा झेल घेतला. हा झेल पाहून केकेआरचा मालक शाहरुख खानही खूप प्रभावित झाला आहे.
लखनऊ सुपर जायंट्सच्या डावातील पाचव्या षटकात मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला होता. षटकाच्या चौथ्या चेंडूवर दीपक हुडानं पॉइंटवर शॉट खेळला. मात्र तिथे उभा असलेला क्षेत्ररक्षक रमणदीप सिंगनं हवेत उडी मारून त्याचा शानदार झेल घेतला. रमनदीपचा हा झेल पाहून सगळेच दंग झाले. त्याच्या या शानदार झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रमणदीपनं घेतलेला हा झेल पाहून स्टँडमध्ये बसलेला शाहरुख खान उभा राहिला आणि त्यानं टाळ्या वाजवूनं त्याचं कौतुक केलं. शाहरुखची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रमणदीपच्या झेलमुळे लखनऊ सुपर जायंट्सला दीपक हुडाच्या रूपानं दुसरा धक्का बसला. दीपक डुडाला 10 चेंडूत केवळ 8 धावा करता आल्या.
Ramandeep plucks a blinder and #LSG are 2️⃣ down! #IPLonJioCinema #TATAIPL #KKRvLSG pic.twitter.com/CeOIG5IP0F
— JioCinema (@JioCinema) April 14, 2024
केकेआरविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना लखनऊनं निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 161 धावा केल्या. लखनऊकडून निकोलस पूरननं 32 चेंडूत सर्वाधिक 45 धावा ठोकल्या. कर्णधार केएल राहुलनं 27 चेंडूत 39 धावांचं योगदान दिलं. कोलकातासाठी मिशेल स्टार्कनं 4 षटकांत 28 धावा देत 3 बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
लखनऊचे करोडो रुपये पाण्यात! दीपक हुडा पुन्हा एकदा ठरला फ्लॉप
पंजाब किंग्जचा विजय प्रीती झिंटासाठी पडला महागात, बनवावे लागले 120 आलू पराठे!