पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीज राजा यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या नुकत्याच पार पडलेल्या हंगामाचे कौतुक केले. यावर्षी आयपीएलचा 16वा हंगाम खेळला गेला. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स संघ अंतिम सामन्यात पोहोचले होते. सीएसकेसाठी रविंद्र जडेजाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून विजय मिळवला. एमएस धोनी खासकरून संपूर्ण हंगामात चर्चेचा विषय बनलेला होता, ही गोष्ट समीज राजांना देखील मान्य आहे.
रमीज राजा (Rameez Raja) दूर्घ काळ पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधार देखील राहिले आहेत. आपल्या यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमीच क्रिकेटविषयी व्यक्त होत असतात. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडिओत म्हटले की, “यावर्षी आयपीएल आपल्या लेग स्पीनर गोलंदाजांसाठी आठवणीत राहील. त्याचसोबत चांगल्या प्रशिक्षकांसाठीही.” राजांनी यावेळी भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सीएसकेला यावर्षी पाचवी आयीपएल ट्रॉफी मिळवून देणाऱ्या एमएस धोनी (MS Dhoni) याचेही कौतुक केले.
आयपीएल 2023 मध्ये एमएस धोनी सर्वाधिक चर्चेत राहिला. धोनी यावर्षी आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करेल, असे सांगितले जात होते. पण अद्याप त्याने निवृत्ती घेतली नाहीये. धोनीविषयी रमीज राजा म्हणाले, “आयपीएल 2023 धोनीने नेतृत्व आणि त्यांच्या यष्टीरक्षणासाठी लक्षात राहील. या हंगामात त्याचा जलवा पाहायला मिळाला. त्याचसोबत सुनील गावसकरांसारख्या दिग्गजाने धोनीकडून आपल्या शर्टावर सही मागीतली. तो क्षण त्याच्यासाठीही सर्वात खास असेल. धोनीसाठी यापेक्षा मोठी उपलब्धी काहीच असू शकत नाही की, गावसकरांसारखा दिग्गज त्याच्याकडे स्वाक्षरी मागत आहे.” यादरम्यान राजांनी पाकिस्तान सुपर लीगचे नाव न घेता या लीगवर निशाणाही साधला.
दरम्यान, यावेळी आयपीएलचे कौतुक करणारे रमीज राजा मागच्या वर्षी मात्र आयपीएल आणि बीसीसीआयवर टीका करत होते. आयसीसी टी-20 विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाला. त्यानंतर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना खेळला गेला. भारताच्या पराभवानंतर रमीज राजा असे म्हटले होते की, कोट्यावधी रुपयांची इंडस्ट्री चालवणारा संघ स्पर्धेतून बाहेर झाला. पाकिस्तान मात्र अंतिम सामन्यात खेळत आहे, कारण त्यांना खेळाडूंची प्रतिभा टिकवून ठेवता येते. (Rameez Raja, who has been critical of the BCCI at times, is praising IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
WTC फायनलआधी ऑस्ट्रेलियाच्या युवा गोलंदाजाचा एल्गार, म्हणाला, “भारताविरुद्ध मी…”
“रोहितला हलक्यात घेऊ नका”, WTC फायनलआधी दिग्गजाने व्यक्त केला विश्वास