पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष रमीज राजा, नेहमीच चर्चेत असतात. जेव्हापासून त्यांची पीसीबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे, तेव्हापासून अनेक मुद्यांवर त्यांनी मते मांडली आहेत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या फायद्यासाठी काही महत्वाचे निर्णय देखील घेतले आहेत. अनेकांना वाटते की पाकिस्तान क्रिकेटचे प्रमुख असल्यामुळे रमीज यांचे मानधन देखील खूप जास्त असेल. आता त्यांनी स्वतः त्यांना मिळणाऱ्या मानधनाची माहिती दिली आहे.
रमीज राजा (Ramiz Raja) यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना पाकिस्तान क्रिकेटच्या अध्यक्षपदी काम करण्याचा शून्य मोबदला मिळतो. त्यांनी असेही सांगितले की, कोणत्याही प्रकारेच अनावश्यक भत्ते देखील त्यांनी घेतले नाहीत. तसेच त्यांच्या अधिकृत दौऱ्यांवर देखील बोर्डाने आतापर्यंत अवघे 2.5 लाख रुपये खर्च केले आहेत. क्रिकेट पाकिस्तानच्या माहितीनुसार बोर्डाच्या एका महत्वाच्या बैठकीत रमीज बोलत होते.
पीसीबी अध्यक्ष या बैठकीत म्हणाले की, “अध्यक्षाच्या रूपात माझे वेतन शून्य आहे आणि मी आतापर्यंत कोणता अनावश्यक भत्ता देखील घेतला नाहीये. मी आतापर्यंत मनोरंजन भत्ता देखील घेतला नाहीये आणि माझ्या अधिकृत दौऱ्यांवर फक्त 2.5 लाख रुपये खर्च झाले आहेत. मी याठिकाणी क्रिकेटच्या प्रमोशनचे काम करायला आलो आहे. मी माझ्या पत्नीलाही कुठल्या अधिकृत दौऱ्यावर नेले नाहीये आणि माझ्या नातेवाईकांना कुठला लाभ मिळवून दिला आहे.”
रमीज राजा पुढे असेही म्हणाले की, त्यांच्या कुटुंबाची जराही इच्छा नव्हती की, त्यांनी पीसीबीचे अध्यक्षपद स्वीकारावे. कुटुंबीयांना आधीपासून कल्पना होती की, या कामासाठी त्यांना एखही रुपया मिळणार नाहीये. ते म्हणाले की, “माझ्या कुटुंबाची इच्छा नव्हती की, मी अध्यक्षपद स्वीकारावे. त्यांना माहिती होते की, पीसीबी अध्यक्षाला काहीच मिळत नाही.”
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकात पाकिस्तान संघ विजेतेपदसाठी प्रमुख दावेदार होता. भारतीय संघाने सुपर फोरमध्ये सलग दोन पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तान ही स्पर्धा जिंकेल, असे वाटत होते. परंतु अंतिम सामन्यात श्रीलंकने त्यांना मात दिली आणि विजेतेपद पटकावले. आता आगामी टी-20 विश्वचषकात चांगले प्रदर्शन करण्यासाठी त्यांचा संघ प्रयत्न करेल. तत्पूर्वी त्यांना इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खएळायची आहे. ही मालिका मंगळवारी 20 सप्टेंबर रोजी सुरू होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
इंजमामचे ‘आलू प्रकरण’ व गांगुलीच्या तुफानी कामगिरीसाठी कायम लक्षात राहिलेली वनडे मालिका
‘नवा बोथम’ म्हणून नावाजल्या गेलेल्या डॅरेन गॉफविषयी १० रंजक गोष्टी
‘अरे तो खराब फॉर्ममध्ये कधी नसतोच!’, केकेआरच्या दिग्गजाने केले रोहित शर्माचे कौतुक