भारताचा बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौरा या महिनाअखेरीस सुरू होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला असून, खेळाडूंनी सराव सुरु केला आहे. जगभरातील माजी क्रिकेटपटू आणि समीक्षक या मालिकेवर नजर ठेवून आहेत. दररोज वेगवेगळे क्रिकेटपटू वेगवेगळी मते मांडत आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि समालोचक रमीझ राजा यांनी या मालिकेविषयी आपली मते व्यक्त केली आहेत.
ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत
रमीझ राजा हे आपल्या यूट्यूब चॅनलवरून दररोज क्रिकेटविषयक घटनांवर आपली मते व्यक्त करत असतात. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चर्चीत मालिकेवर बोलताना ते म्हणाले, “ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. आता तिथे पहिल्यासारखा चेंडू स्विंग होत नाही. तसेच, चेंडू उसळी घेत नाही. त्यामुळे भारतीय फलंदाजांना तिथे खेळताना सहजता वाटेल.”
आर्थिक फायद्यासाठी भारताला मिळतील सोप्या खेळपट्ट्या
कोविड-१९ महामारीमुळे सर्व प्रकारचे क्रिकेट अनेक दिवस बंद होते. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला यातून बरेच आर्थिक नुकसान झाले आहे. त्या गोष्टींवर प्रकाश टाकताना राजा म्हणाले, “क्रिकेट ऑस्ट्रेलिया आपल्या आर्थिक फायद्यासाठी भारताविरुद्धच्या मालिकांचा वापर करेल. कसोटी मालिकेतील सर्व सामने पाच दिवस चालले, तर त्यातून क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अधिक पैसे मिळतील. त्यामुळे, कसोटी सामने पूर्ण पाच दिवस चालतील. अशा प्रकारच्या खेळपट्ट्या बनविण्यात येऊ शकतात.”
भारतीय संघाचे केले कौतुक
राजा यांनी आपल्या शोमध्ये सध्याच्या भारतीय संघाचे देखील कौतुक केले. राजा म्हणाले, “भारताकडे सध्या ऑस्ट्रेलियापेक्षा तगड्या फलंदाजांची फळी आहे. गोलंदाज देखील अनुभवी आणि दर्जेदार आहेत. त्यामुळे मालिकेत भारताचे पारडे जड राहील. ऑस्ट्रेलियाला देखील या गोष्टीची जाणीव आहे.”
रोहीतची कमतरता भासणार
राजा यांनी मर्यादित षटकांच्या मालिकांविषयी बोलताना सांगितले, “वनडे आणि टी२० मालिकांमध्ये भारताला रोहित शर्माची कमतरता भासेल. रोहित सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. त्याच्या नसण्याने भारताच्या फलंदाजीवर निश्चितच परिणाम होईल.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने होईल. सिडनी येथे हा पहिला वनडे सामना २७ नोव्हेंबरला खेळण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर; ‘हा’ खेळाडू ऑस्ट्रेलियाला जाण्यास सज्ज
कोहलीची अनुपस्थिती ‘या’ खेळाडूसाठी ठरणार सर्वात फायदेशीर, हरभजन सिंगने सांगितले नाव
ट्रेंडिंग लेख-
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी