भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचला आहे, जिथे ते 3 वनडे, 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेसह 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका खेळणार आहेत. या बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेआधी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कसोटी संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे.
आयपीएल दरम्यान, इशांत शर्मा दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना जखमी झाला होता, त्याच्या डाव्या पायाच्या स्नायूला दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो लीगच्या बाहेर पडला होता. पण बुधवारी(18 नोव्हेंबर) त्याने बंगळुरु येथील एम चिन्नास्वामी स्टेड़ियममध्ये गोलंदाजी केली आहे. यावेळी त्याने लाँग स्पेलही टाकले. त्यावेळी तेथे एनसीएचे प्रमुख राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ता सुनील जोशीही उपस्थित होते. त्यामुळे इशांतने तंदुरुस्ती चाचणी पार केली आहे.
एनसीए येथे राहुल द्रविड आणि मुख्य फिजिओ आशिष कौशिक यांच्या देखरेखीखाली इशांत शर्मा सध्या दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे तो लवकरच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात सामील होण्याची शक्यता आहे. हा त्याच्या कारकिर्दीतील 5 वा ऑस्ट्रेलिया दौरा असणार आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ईशांत शर्मा गोलंदाजीसाठी धाव घेताना दिसत आहे. यावेळी राहुल द्रविड आणि सुनील जोशी तेथे त्याला गोलंदाजी करताना पाहत आहेत. उल्लेखनीय आहे की या वेळी तो मुख्यत्वे फक्त एका स्टंपवर गोलंदाजी करीत होता, तिथे पारस भांबरे आणि मन्सूर खान यांच्यासारखे एनसीएचे प्रशिक्षक सदस्यही उपस्थित होते.
Ishant Sharma bowls at the M. Chinnaswamy Stadium in Bengaluru as he looks to prove his fitness for India's Test series against Australia. pic.twitter.com/jfwGCY3ag2
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 18, 2020
अलीकडेच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, ऍडलेड कसोटीपूर्वी इशांत शर्मा संघात पुनरागमन करू शकतो.
विशेष म्हणजे, जर इशांत शर्मा ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेला आणि कसोटी सामने खेळण्यास यशस्वी झाला तर तो कपिल देव यांच्यानंतर 100 कसोटी सामने खेळणारा दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज बनेल. तसेच कसोटीत 300 बळी पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त 3 बळींची आवश्यकता आहे. जर त्याने 3 बळी घेतले तर हा विक्रम गाठणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीतही त्याचा समावेश होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
कोहलीची अनुपस्थिती ‘या’ खेळाडूसाठी ठरणार सर्वात फायदेशीर, हरभजन सिंगने सांगितले नाव
दिग्गजाने निवडलेल्या परदेशी खेळाडूंच्या आयपीएल संघात स्टोक्सला डच्चू; ‘हा’ आहे कर्णधार
दक्षिण आफ्रिका-इंग्लंड क्रिकेट मालिकेवर कोरोनाचं सावट; खेळाडू आढळला पॉझिटिव्ह
ट्रेंडिंग लेख –
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी