भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातील चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु दोन्ही देशातील अंतर्गत वादांमुळे द्विपक्षीय मालिका खेळली जात नाहीये. हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमने सामने येत असतात. आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत देखील भारतीय संघाची पहिली लढत पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडणार आहे. दरम्यान पाकिस्तान विरुद्ध भारत द्विपक्षीय मालिका खेळवण्याबाबत रमिज राजा यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
भारत पाकिस्तान द्विपक्षीय मालिका खेळण्याबाबत रमिज राजा यांचे स्पष्ट मत आहे की, असे होणे सध्या कठीण दिसून येत आहे कारण बऱ्याच गोष्टींवर काम करायचं बाकी आहे. त्यांनी सोमवारी (१८ ऑक्टोबर) म्हटले की, “आशिया क्रिकेट परिषदेने २०२३ आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यासाठी होकार दिला आहे. जो ५० षटकांचा असणार आहे. ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पार पडणार आहे.”
तसेच रमिज राजा पुढे म्हणाले की, “आम्ही सौरव गांगुली आणि जय शाहा यांची भेट घेतली आहे. आमचे प्रयत्न सुरू आहेत की, क्रिकेट सुरु ठेवण्यासाठी क्रिकेटला राजनितीपासून दूर करावे.”
मात्र याबाबत भारताकडून कुठलेही वक्तव्य करण्यात आले नाही. दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. अशातच जर पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तर, भारतीय संघ पाकिस्तानला जाणार का? हा मोठा प्रश्न आहे. जर भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला, तर नाईलाजाने आशिया चषक स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करावी लागेल. यावर्षी देखील आशिया चषक स्पर्धेचे आयोजन श्रीलंकेत करण्यात येणार होते. परंतु भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी इंग्लंडमध्ये होता. त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती
येणाऱ्या वर्षात श्रीलंकेत आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा २० षटकांची असणार आहे. यामागील कारण असे की, २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धू धू धुतला…! ४, ४, ४, ४, ४ पाकिस्तानी गोलंदाजावर अक्षरश: तुटून पडला कायरन पोलार्ड, पाहा व्हिडिओ
‘हो तो घाबरतोय’, फलंदाजी करत असलेल्या गेलची पाकिस्तानी गोलंदाज अन् यष्टीरक्षकाने उडवली खिल्ली
टी२० विश्वचषकातील गेलचा ‘हा’ विक्रम मोडणे अशक्य, विस्फोटक फलंदाज रोहित-ब्रावोलाही नाही जमणार