गाॅल | इंग्लंड विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेला आज सुरुवात झाली. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात आज रंगाना हेराथने कसोटी क्रिकेटमधील मोठा पराक्रम केला.
हेराथने कसोटी क्रिकेटमध्ये एकाच मैदानावर १०० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. गाॅल येथील गाॅल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर त्याने आज आपली १००वी विकेट घेतली. त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रुटला ३५ धावांवर त्रिफळाचीत करत हा कारनामा केला.
यापुर्वी केवळ मुथय्या मुरलीधरन आणि जेम्स अॅंडरसन या दोनच खेळाडूंना असा कारनामा करता आला आहे.
मुरलीधरनने कोलंबो (१६६), कॅंडी (११७) आणि गाॅल (१११) येथे १०० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत तर जेम अॅंडरसनने लाॅर्ड्सवर १०३ विकेट्स घेतल्या आहेत.
यामुळे कसोटीत रंगाना हेराथचे नाव नक्कीच सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार आहे. या कसोटी सामन्यानंतर तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत आहे.
या दिग्गज ४० वर्षीय खेळाडूने कसोटीत आजपर्यंत ९३ सामन्यात ४३१ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सध्या संयुक्तपणे ९व्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–धोनी, विराटलाही जे जमले नाही ते रोहित शर्माला करण्याची संधी
–एकही चेंडू न टाकता विराटने घेतली होती पहिली टी20 विकेट
–बर्थडेच्या दिवशीच पाकिस्तानच्या खेळाडूने मोडला विराटचा विक्रम