---Advertisement---

लज्जास्पद! क्रिकेटर अमित मिश्राच्या कुटुंबियांना बेदम मारहाण, गर्भवती पत्नीचं डोकंही फोडलं

On: बुधवार, डिसेंबर 29, 2021 12:31 PM
---Advertisement---

छत्तीसगढच्या बिलासपूरमध्ये सोमवारी (२७ डिसेंबर) रणजी खेळाडू अमित मिश्राच्या (Amit Mishra) घरात घुसून त्याच्या कुटुंबीयांना समाजकंटकांनी बेदम मारहाण केली. त्यांनी रॉड, फावडा आणि दंडुके घेऊन सगळ्यांना बेदम मारहाण केली. त्यांनी अमितचे आई-वडील, त्याची बायको, त्याचा लहान भाऊ आणि त्याची गर्भवती असणाऱ्या बायकोवर हल्ला चढवला. सगळ्यांना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सगळ्यांची स्थिती गंभीर आहे.

सोमवारी सकाळी जेव्हा ही घटना घडली, तेव्हा अमित अहमदाबादमध्ये रणजी (Ranji Trophy) कॅम्पमध्ये होता. अमितच्या बायकोने हल्ल्याची माहिती त्याला फोनवरून दिली आणि अमित लगेच बिलासपूरला पोहचला. पोलिसांकडे साधारण मारहाणीची एफआयआर नोंद केली. त्यानंतर हत्येचा प्रयत्न करण्याची नोंद करण्यास सांगितली आहे. हे प्रकरण बिलासपूरच्या सरकंड ठाणे क्षेत्रात घडले आहे.

वादाचं नक्की कारण तरी काय?
माध्यमांतील वृत्तांनुसार, अमित मिश्राच्या शेजारी राहणारे गंगाधर मिश्रा हे त्यांच्या घराचं रंगकाम करत होते. सोमवारी सकाळी गंगाधर मिश्रा अमितच्या घरात गेले आणि त्यांनी घराला लागून असलेल्या भिंतीला रंगवून घ्या असं सांगितलं. पण अमितचे वडील चंद्रिका प्रसाद म्हणाले पूजा झाल्यानंतर आणि घरातलं काम झाल्यानंतर आपण ते करू. त्यामुळे आरोप असा आहे की, यामुळेच गंगाधर मिश्रांना राग आला आणि गंगाधर यांनी आपला भाऊ, दोन मुले आणि मित्रांना घेऊन अमितच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली.

रणजीमध्ये रेल्वे संघाकडून खेळतो अमित
अमित मिश्राने आपल्या कारकिर्दीची सुरुवात २००८ मध्ये केली होती. तेव्हा तो मध्य प्रदेश संघाकडून (Madhya Pradesh Cricket Team) खेळत होता. यानंतर आता तो रेल्वे संघाकडून (Railways Cricket Team) खेळतोय. तो विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) सुद्धा खेळला आहे. तसेच सेंट्रल झोन टी-२० सुद्धा खेळला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘विकेट्सचा पंचक’ घेत शमी स्वर्गीय वडिलांच्या आठवणीत भावुक; म्हणाला, ‘३० किमी सायकल चालवून मला ॲकेडमीत…’

सुट्टीचा आनंद घेत शार्दुल-अश्विनने खोलली मजेदार प्रसंगांची पोतडी; पाहा व्हिडिओ

इंग्लंडचे पानिपत करणाऱ्या बोलँडला भारतीय फलंदाजांनी दाखवलेले दिवसा तारे; वाचा ‘त्या’ मालिकेविषयी

हेही पाहा-

टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं | HARBHAJAN FINED IN NEW ZEALAND

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---