रणजी ट्रॉफी 2018-19 मध्ये बिहार संघाच्या आशुतोष अमनने एका हंगामात 68 विकेट्स घेत दिग्गज क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचा 44 वर्ष जुना विक्रम मोडला आहे.
बेदी यांनी दिल्लीकडून खेळताना 1974-75च्या रणजी हंगामात 64 विकेट्स घेतल्या होत्या. पटना येथे सुरू असलेल्या मणिपूर विरुद्धच्या सामन्यात आशुतोषने अशी कामगिरी केली आहे. हा त्याचा रणजीमधील आठवाच सामना आहे.
या दोघांबरोबरच रणजीमध्ये एकाच हंगामात 50 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये कर्नाटककडून खेळणारा डोड्डा गणेश तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 1998-99च्या हंगामात 62 विकेट्स घेतल्या होत्या.
त्याचबरोबर कंवलजीत सिंगनेही हैद्राबादकडून खेळताना 1999-2000च्या हंगामात 62 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच एस वेंकेटराघवनने तमिळनाडूकडून खेळताना 1972-73च्या रणजी हंगामात 58 विकेट्स तर दिल्लीकडून मनिंदर सिंगने 1991-92च्या हंगामात 58 विकेट्स घेतल्या होत्या.
यावर्षी बिहार संघ पहिल्यांदाच रणजीमध्ये खेळत आहे. आशुतोषने नोव्हेंबर महिन्यात संघात पदार्पण करताना आत्तापर्यंत सात सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने सिक्कीम, मेघालय, अरूणाचल प्रदेश आणि नागालॅंड या संघांविरुद्ध प्रत्येकी दहा विकेट्स घेतल्या आहेत.
32 वर्षीय, आशुतोषने गोलंदाजी बरोबर फलंदाजीमध्येही चमक दाखवली आहे. त्याने सिक्कीम विरुद्ध 89 धावा तर मिझोरम विरुद्ध 111 धावांची खेळी केली आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
68 – आशुतोष अमन (2018-19, बिहार)
64 – बिशनसिंग बेदी (1974-75, दिल्ली)
62 – डोड्डा गणेश (1998-99, कर्नाटक)
62 – कंवलजीत सिंग (1999-2000, हैद्राबाद)
58 – एस वेंकेटराघवन (1972-73, तमिळनाडू)
58 – मनिंदर सिंग (1991-92, दिल्ली)
महत्त्वाच्या बातम्या-
–पहा कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने घेतले आहे किती शिक्षण ?
–विश्वचषक विजेता शुबमन गिल स्टार आहे, लवकरच येणार टीम इंडियात
–११५ धावा करूनही या खेळाडूचे हुकले शतक, जाणून घ्या कसे