रणजी ट्रॉफी (Ranji trophy 2022) ही देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सर्वात मोठी स्पर्धा आहे. याच स्पर्धेतून युवा खेळाडू समोर येत असतात आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत असतात. परंतु या स्पर्धेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. (latest update on Ranji trophy)
रणजी ट्रॉफी २०२२ स्पर्धा रद्द होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा रद्द करण्यात येऊ शकते. एका इंग्रजी वृत्तपत्राने बीसीसीआयच्या हवाल्याने माहिती दिली आहे की, २०२१ वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर यावर्षी ही स्पर्धा पार पडणार होती. परंतु कोरोनाचा नवीन प्रकार ऑमीक्रॉनच्या भीतीमुळे ४ जानेवारी रोजी होणारी स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.
‘दि न्यू इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, १८ जानेवारी रोजी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला होता की, कोरोनाची परिस्थिती सुधारताच कूचबिहार ट्रॉफी, सीके नायडू आणि वरिष्ठ महिला टी२० यांसारख्या देशांतर्गत स्पर्धा आयोजित केल्या जातील. परंतु, रणजी ट्रॉफी स्पर्धा आयोजित करण्यासाठी बीसीसीआयकडे वेळ नाहीये. बीसीसीआयने स्टेट असोसीएशनला याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिली नाहीये.
ज्यावेळी ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती, त्यावेळी असे म्हटले गेले होते की, या स्पर्धेची दोन गटात विभागणी केली जाईल. यानुसार एक टप्पा आयपीएल स्पर्धेच्या आधी असेल आणि दुसरा टप्पा आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर असेल. या रणानितीनुसार, पहिल्या टप्प्यातील सामने फेब्रुवारी – मार्च दरम्यान होणार होते. तर दुसरा टप्पा जून – जुलै किंवा सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्यात येणार होता. परंतु त्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता असते. जर, बीसीसीआयला स्पर्धेची विभागणी दोन टप्प्यात करायची असेल तर या स्पर्धेची सुरुवात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला करावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक घोषित; भारत-पाकिस्तान सामना रंगणार ‘या’ दिवशी
पुजारा-रहाणेचे ‘बुरे दिन’ सुरू! संघातील जागा तर जाणारच सोबत आर्थिक नुकसानही पक्के
हे नक्की पाहा: