रणजी ट्रॉफी सेमी फायनलमध्ये मुंबईचा संघ तामिळनाडू विरुद्ध अडचणीत सापडली आहे. तामिळनाडूच्या 146 धावांचा पाठलाग करताना मुशीर खान याचा अपवाद वगळता मुंबईचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत. दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत मुंबईने 51 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 125 धावा केल्या होत्या. मात्र शार्दुलने हार्दिक तामोरे याच्यासह मुंबईचा डाव सावरत दमदार अर्धशतक ठोकलं. शार्दूलच्या या अर्धशतकी खेळीमुळे मुंबईला आघाडी घेता आली. तर दुसऱ्या बाजूला हार्दिक तामोरे यानेही चांगली साथ दिली आहे.
याबरोबरच मुशीर खान 55 धावांवर आऊट झाल्याने मुंबईची स्थिती 6 बाद 106 अशी झाली. त्यानंतर शार्दुल मैदानात आला. मुशीरनंतर शम्स मुलानी दुसऱ्याच बॉलवर झिरोवर आऊट झाला. त्यामुळे मुंबईचा स्कोअर 7 बाद 106 असा झाला. त्यानंतर हार्दिक तामोरे आणि शार्दूल ठाकुर यादोघांनी मुंबईचा डाव सावरला. दोघांनी 1-2 धावा घेतल्या. संधी मिळेल तेव्हा मोठे फटके मारले आहेत. तसेच शार्दूलने निर्णायक क्षणी झुंज देत मुंबईसाठी शतक केलं आहे.
HUNDRED FOR SHARDUL THAKUR IN RANJI SEMI WHEN TEAM WERE 106/7 🫡
– The celebration was fire. 🔥pic.twitter.com/IubSed3uzF
— Johns. (@CricCrazyJohns) March 3, 2024
शार्दुलने मुंबईच्या डावातील 81 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर तामिळनाडूच्या बाबा इंद्रजीथ याच्या बॉलिंगवर पुढे येत खणखणीत सिक्स खेचला आणि शतक पूर्ण केलं. शार्दुलने 89 बॉलमध्ये आपलं पहिलवहिलं शतक पूर्ण केलं. शार्दुलच्या या शतकी खेळीत 12 चौकार आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर शार्दुलने 113.5 च्या स्ट्राईक रेटने शतक पूर्ण केलं आहे.
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, भूपेन लालवाणी, मुशीर खान, शम्स मुलाणी, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि तुषार देशपांडे.
तामिळनाडू प्लेईंग ईलेव्हन | रविश्रीनिवासन साई किशोर (कॅप्टन), एन जगदीसन (विकेटकीपर), साई सुदर्शन, बाबा इंद्रजीथ, प्रदोष पॉल, विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, एम मोहम्मद, एस अजित राम, संदीप वॉरियर आणि कुलदीप सेन.
महत्वाच्या बातम्या –
- IPL 2024 : मोठी बातमी! गुजरात टायटन्सच्या ‘या’ स्टार खेळाडूचा अपघात, बाइक पडली महागात
- Ranji Trophy 2024 : साई किशोरचा पंजा..! मुंबईचा संघ सेमी फायनलमध्ये अडचणीत, अजिंक्य पुन्हा अपयशी