रणजी ट्रॉफी सेमी फायनलमध्ये मुंबईचा संघ तामिळनाडू विरुद्ध अडचणीत सापडला आहे. कारण तामिळनाडूच्या 146 धावांचा पाठलाग करताना मुशीर खान वगळता मुंबईचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत. तसेच फलंदाजीमध्ये तामिळनाडूची कामगिरी काही खास नसली तरी गोलंदाजीत साई किशोरने संघात पुनरागमन करत उपांत्य फेरीच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी साई किशोरने अप्रतिम गोलंदाजी करत लंच ब्रेकपर्यंत साई किशोर मुंबईने 5 विकेट्स घेतल्या आहेत.
याबरोबरच लंच ब्रेकपर्यंत मुंबईने 51 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 125 धावा केल्या. मुंबई अजूनही 21 धावांनी पिछाडीवर आहे. मुंबईचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याने पुन्हा एकदा निराशा केली आहे. तसेच मुंबईची पहिल्या डावातील सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. पृथ्वी शॉ 5, भुपेन ललवाणी 15 आणि मोहित अवस्थी 2 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे मुंबईचा स्कोअर 3 आऊट 48 असा झाला होता.
दरम्यान, साई किशोरने 2018-19 च्या हंगामातील लिलावात त्याचे नाव दिले होते परंतु या दोन्ही हंगामात त्याला कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतले नाही. मात्र, आयपीएलमध्ये साई किशोरने चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जसारख्या संघांमध्ये नेट गोलंदाज म्हणून गोलंदाजी केली आहे. तसेच साई किशोरने 2016-17 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये साईची कामगिरी चमकदार राहिली आहे.
यानंतर या स्पर्धेत साईने शानदार गोलंदाजी करत 12 विकेट्स घेत स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज ठरला होता. 2018-19 रणजी ट्रॉफीमध्ये साईने आपल्या अप्रतिम कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. साईने या मोसमात 6 सामन्यात 22 विकेट घेतल्या होत्या.
Fabulous fifer 👌👌
Captain Sai Kishore has spearheaded Tamil Nadu's fightback against Mumbai with a splendid spell so far 👏👏
Relive 📽️ his brilliant spell @IDFCFIRSTBank | #RanjiTrophy | #MUMvTN | #SF2
Scorecard ▶️ https://t.co/9tosMLk9TT pic.twitter.com/zOhv6ZWuNt
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 3, 2024
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, भूपेन लालवाणी, मुशीर खान, शम्स मुलाणी, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि तुषार देशपांडे.
तामिळनाडू प्लेईंग ईलेव्हन | रविश्रीनिवासन साई किशोर (कॅप्टन), एन जगदीसन (विकेटकीपर), साई सुदर्शन, बाबा इंद्रजीथ, प्रदोष पॉल, विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, एम मोहम्मद, एस अजित राम, संदीप वॉरियर आणि कुलदीप सेन.
महत्वाच्या बातम्या –
- अनंत-राधिका प्रीवेडिंग! महेंद्रसिंग धोनी मोहिनी, ब्राव्हो आणि साक्षीसोबत खेळला दांडिया, पाहा व्हिडिओ
- रोहित शर्माला 3 ICC ट्रॉफी जिंकण्याची संधी, 15 महिन्यांत करू शकतो मोठा पराक्रम