मुंबई संघ पुन्हा एकदा रणजी ट्रॉफीचा विजेता संघ बनला आहे. विदर्भ संघासोबतच्या लढतीत गुरुवार (15 मार्च) मुंबईने अंतिम सामन्यात 169 धावांनी बाजी मारली. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात मुंबईला मिळालेले हे 42वे विजेतेपद आहे. सर्वाधिक वेळा रणजी ट्रॉफी मिळवणाऱ्यांच्या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघात 34 विजेतेपदांचे अंतर आहे.
मुंबई आणि विदर्भ यांच्यातील रणजी ट्रॉफी 2024चा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. विदर्भने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात मुंबईने 224, तर विदर्भने 105 धावांवर विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात मुंबईने दुसऱ्या डावात 418 धावा केल्या. तर विदर्भ संघ 538 धावांचे लक्ष्य गाठताना 368 धावांवर सर्वबाद झाला. कर्णधार अक्षय वाडकर याने 102 धावांची अप्रतिम खेळी केली. त्याआधी मुंबईसाठी दुसऱ्या डावात मुशीर खान याने 136, तर श्रेयस अय्यर याने 95 धावांची खेळी केली होती. शार्दुल ठाकूर यानेही पहिल्या डावात 75 धावांची सर्वोत्तम खेळी मुंबईसाठी केली होती.
१९३४ पासून सुरु झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेचे आत्तापर्यंत मुंबई संघाने सर्वाधिक ४२ वेळा विजेतेपद मिळवले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकने ८ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. बंगाल संघ १२ तर तामिळनाडू १० वेळा या स्पर्धेचा उपविजेता राहिला आहे.
१९५८-५९ ते १९७२-७३ या काळात सलग १५ वेळा मुंबईने या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. या स्पर्धेत राज्यांच्या संघासह रेल्वे व आर्मीचाही संघ खेळला आहे. रेल्वेने २ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.
आजपर्यंतचे ८६ रणजी ट्राॅफी विजेते –
४२- मुंबई
८- कर्नाटक
७- दिल्ली
५- बडोदा
४- होळकर
२- हैद्राबाद
२- बंगाल
२- महाराष्ट्र
२- तामिळनाडू
२- राजस्थान
२- रेल्वे
२- विदर्भ
१- नवानगर
१- पश्चिम भारत
१- हरियाणा
१- पंजाब
१- युपी
१- गुजरात
१- सौराष्ट्र
अधिक वाचा –
–संपुर्ण यादी: आजपर्यंतचे सर्व रणजी ट्राॅफी विजेेते व उपविजेते