Moin-ul-Haq Stadium Patna: मोईन-उल-हक स्टेडियम, पाटणा येथे मुंबई आणि बिहार यांच्यात होणार्या रणजी ट्रॉफी 2024 मधील ब गटाचा सामना क्रिकेटव्यतिरिक्त इतर कारणांमुळे चर्चेत आला आहे. सध्या मैदानाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये स्टेडियम जीर्ण अवस्थेत दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक चाहता रणजी सामन्याच्या एक दिवस अगोदर संपूर्ण स्टेडियमचे दृश्य दाखताना दिसत आहे. यावेळी मुंबई संघ सराव करताना दिसत आहे. परंतु मैदानातील स्टँडची स्थिती अत्यंत दयनीय आहे, कारण चाहत्यांना बसून खेळ पाहण्यासाठी येथे जागाच उरली नाही. तर या मैदानाच्या स्टँडवर चक्क लोकांनी कपडे सुकायला घातलेली दिसत आहेत. (ranji trophy venue moin ul haq stadium goes viral for its dilapidated condition)
उल्लेखनीय म्हणजे या अगोदर मोईन-उल-हक स्टेडियममध्ये नऊ आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले गेले होते. डिसेंबर 1997 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिलांचा एकदिवसीय सामना येथे खेळला गेला होता. तेव्हापासून या मैदानावर कोणताही आंतरराष्ट्रीय सामना आयोजित केला गेला नाही, परंतु आता या मैदानाची दयनीय अवस्था सर्वांसमोर आली आहे.
दरम्यान, मुंबई विरुद्ध बिहार रणजी ट्रॉफी सामन्याच्या पहिल्या दिवशी मुंबईचा कर्णधार शम्स मुलानी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, पाहुण्यांसाठी सुरुवात चांगली झाली नाही त्यांनी त्यांचा सलामीवीर जय बिस्ता याची विकेट केवळ पाच धावांवर गमावली.
The condition of the Moin-ul-Haq stadium in Patna, where the Mumbai versus Bihar Ranji match is scheduled for tomorrowpic.twitter.com/mLeKDBs5M7
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) January 5, 2024
सुरुवातीच्या धक्क्यानंतर भूपेन लालवानी आणि सुवेद पारकर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी करून डाव सावरला. साकिबुल गनी याने ललवानीला 65 धावांवर बाद केले. आणि त्याच्या पुढच्याच षटकात गनीने सराफराज खान यालाही एका धावेवर बाद करून मुंबईला तिसरा धक्का दिला.
मात्र, सुवेद पारकर याने एक बाजू राखून शानदार अर्धशतक (111 चेंडूत 50) झळकावले. शिवम दुबे (61 चेंडू 41) आणि तनीश कोटियन (69 चेंडूत 50) यांच्या सुरेख फलंदाजीमुळे मुंबईने पहिल्या दिवशी 235/9 अशी मजल मारली. बिहारकडून वीर प्रताप सिंगने 32 धावांत 4 विकेट्स घेतल्या. तर साकिबुल गनीने दोन विकेट्स घेतल्या. (Ranji Trophy People put clothes to dry at the stadium where a very important match is going on see the plight)
हेही वाचा
BBL 2023-24: बिग बॅश लीगमध्ये घडली मोठी घटना, मेलबर्न स्टार्स विकेटकीपरच्या डोक्याला गंभीर दुखापत
Cricketer of the Year: ICCकडून 2023 ‘क्रिकेटर ऑफ द ईयर’ खेळाडूंची यादी जाहीर, भारताच्या ‘या’ दोन खेळाडूंच्या नावांचा समावेश