नुकताच रणजी ट्रॉफी २०२१-२२ हंगामाचा थरार संपला आहे. बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने मुंबईवर ६ विकेट्सने विजय मिळत रणजी ट्रॉफी विजयाचा दुष्काळ संपवला आहे. मात्र विजेतेपद मिळवल्यानंतर विजेत्या आणि उपविजेत्या संघांना किती बक्षिस रक्कम मिळाली का? मालिकावीराने किती बक्षीस मिळवले? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) ८७ वर्षांच्या इतिहासात प्रथम विजेतेपद पटकावणाऱ्या मध्य प्रदेश संघाला बीसीसीआयकडून २ कोटी रुपये बक्षिस म्हणून मिळाले आहेत. तर उपविजेत्या मुंबई संघालाही १ कोटी रुपये मिळाले आहेत. याव्यतिरिक्त मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशननेही आपल्या संघासाठी २ कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा (Ranji Trophy Prize Money) केली आहे. अर्थातच मध्य प्रदेश संघाला एकूण ४ कोटी रुपये बक्षिसाच्या रूपात मिळाले आहेत.
याव्यतिरिक्त अंतिम सामन्यात मध्य प्रदेशकडून शानदार खेळी खेळणाऱ्या शुभम शर्मा याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध पहिल्या डावात ११६ आणि दुसऱ्या डावात ३० धावा फटकावल्या होत्या. यानंतर त्याला पारितोषिक म्हणून त्याला २५ हजार रुपये दिले गेले आहेत. शिवाय संपूर्ण रणजी ट्रॉफी हंगामात आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडणाऱ्या सरफराज खानला मालिकावीर पुरस्कार मिळाल्याच्या मोबदल्यात १ लाख रुपयांचे बक्षिस दिले गेले आहे.
आता रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला किती सामना शुल्क मिळेल, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. रणजी ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना सामन्यांच्या संख्येच्या आधारवर सामना शुल्क दिले जाते. २० पेक्षा कमी सामने खेळणारे, २१-४० सामने खेळणारे आणि ४० पेक्षा जास्त सामने खेळणारे खेळाडू अशा वर्गांनुसार खेळाडूंना पैसे मिळतात.
जर कोणत्या खेळाडूने २० पेक्षा कमी सामने खेळले असतील तर प्रति दिन सामना शुल्क म्हणून २५ हजार रुपये मिळतात. याच हिशोबाने उपांत्य सामना आणि अंतिम सामना खेळणाऱ्या खेळाडूंना १.२५ लाख रुपये सामना शुल्काच्या रूपात मिळतील. जर २० सामने खेळणारा खेळाडू प्लेइंग इलेव्हनचा भाग नसेल तर त्याला सामना शुल्काच्या रुपात २० हजार दर दिवसाचे मिळतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsSL | अट्टापट्टूच्या वादळी खेळीच्या जोरावर श्रीलंकेचा विजयी शेवट, ७ विकेट्सने जिंकली तिसरी टी२०
ओएन मॉर्गन होणार निवृत्त! ढासळलेला फॉर्म आणि फिटनेस हेच कारण
कर्णधार पंड्याचं व्हिजन आयपीएल २०२३, भारत-आयर्लंड टी२०तून गुजरात टायटन्ससाठी शोधलाय हिरा!






