लंडन। गुरुवारी 2019 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 104 धावांनी मोठा विजय मिळवत या स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी 312 धावांचे रक्षण करताना दक्षिण आफ्रिकेला 207 धावांवर रोखण्यात यश मिळवले.
पण या सामन्यात दक्षिण आफ्रिका 312 धावांच्या आव्हानाच पाठलाग करत असताना 11 व्या षटकात एक नाट्यपूर्ण घटना पहायला मिळाली. या षटकात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डीकॉक फलंदाजी करत असताना आदिल रशीदने टाकलेला एक चेंडू स्टंम्पला लागला, पण बेल्स न पडल्याने डीकॉकला नाबाद देण्यात आले.
झाले असे की आदिल राशीदने टाकलेल्या 11 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर डीकॉकने रिवर्स स्विपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू हलका त्याच्या बॅटला लागला आणि ऑफ स्टंम्पला थोडासा घासून यष्टीरक्षक जॉस बटलरच्या पायांच्या मधून निघून बाउंड्री लाईनच्या पार गेला.
ज्यावेळी हा चेंडू ऑफ स्टंम्पला लागला तेव्हा स्टंपवरील लाईट लागले मात्र बेल्स पडल्या नाहीत. त्यामुळे पंचांनी डीकॉक नाबाद असल्याचा निर्णय दिला. यावेळी स्टम्पवरील लाईट पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनी जल्लोष केला पण लगेचच बेल्स पडल्या नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर पंचांनी एकदा बेल्स तपासणीही केली. तसेच या चेंडूवर डीकॉकला चौकारही मिळाला.
https://twitter.com/tejaspatel_dr/status/1134141187537825794
ही घटना घडली तेव्हा डीकॉक 23 धावांवर खेळत होता. त्याने नंतर या जीवदानाचा फायदा घेत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. पण तो दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. त्याने 74 चेंडूत 68 धावांची खेळी केली.
तसेच दक्षिण आफ्रिकेकडून डी कॉकबरोबरच रस्सी व्हॅन डर दसननेही 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र त्यांच्या अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
तत्पूर्वी इंग्लंडकडून जेसन रॉय(54), जो रुट(51), कर्णधार इयान मॉर्गन(57) आणि बेन स्टोक्सने(89) या चार फलंदाजांनी अर्धशतके केली. त्यामुळे इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 311 अशी मोठी धावसंख्या उभारली.
गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरनेही सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
चेंडू स्टंम्पला लागल्यानंतरही बेल्स न पडण्याच्या घटना विश्वचषकापूर्वी नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल दरम्यानही पहायला मिळाल्या होत्या. त्यावेळीही याबद्दल बरीच चर्चा झाली होती.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–इंग्लंडच्या फलंदाजांनी विश्वचषकात पहिल्यांदाच मारला हा खास चौकार
–सुपरमॅन बेन स्टोक्स! घेतला एका हाताने अफलातून झेल, पहा व्हिडिओ





टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा