---Advertisement---

IPL फायनलसाठी गोलंदाजीच नाही, तर फलंदाजीसाठीही तयार राशिद खान; म्हणतोय…

On: रविवार, मे 29, 2022 5:59 PM
Rashid-Khan
---Advertisement---

इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) २०२२ चा विजेता कोण होणार हे समजण्यासाठी आता मात्र काही तास उरले आहेत. २९ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे आयपीएल २०२२ चा अंतिम सामना होणार आहे. हा सामना यंदाच्या हंगामात नव्याने तयार झालेला गुजरात टायटन्सचा संघ पहिल्याच हंगामात फायनलमध्ये पोहोचला आहे. मात्र, गुजरातला राजस्थान रॉयल्सचे तगडे आवाहन समोर आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत गुजरातचा गोलंदाज राशिद खान याने राजस्थानच्या संघाला आव्हान दिले आहे.

राशिद खानच्या (Rashid Khan) यंदाच्या हंगामात इकॉनॉमी रेट १५ सामन्यांमध्ये ६.७३ आहे, जो खूपच प्रभावी आहे. तो या यादीत १८ विकेटसह नवव्या स्थानावर आहे. तो फलंदाजीतही चमत्कार करू शकतो, हे राशिदने दाखवून दिले आहे. त्याने या मोसमात २०६ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने नऊ षटकार मारले आहेत. यावरून राशिद यंदाच्या वर्षी गोलंदाजीसह फलंदाजीमध्येही आपली चमक दाखवत आहे हे सिद्ध होत आहे.

अंतिम सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत राशिद म्हणाला की, “प्ले ऑफमध्येही माझी रणनीती वेगळी नव्हती. संपूर्ण स्पर्धेत माझी हिच ऊर्जा आणि विचार प्रक्रिया आहे. विरुद्ध संघ माझ्याविरुद्ध सावधपणे खेळत आहेत. त्यामुळे मी इकोनॉमी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामुळे दुसऱ्या टोकाला गोलंदाजाने विकेट घेण्याची शक्यताही वाढते. लीग सामना असो किंवा बाद फेरी, माझे मन एका विशिष्ट क्षेत्रात गोलंदाजी करण्यावर केंद्रित असते आणि मी काही वेगळे करण्याचा प्रयत्न करत नाही. दबाव निर्माण करणे हा माझा उद्देश आहे.”

राशिदने या हंगामात फलंदाजीतही चांगले योगदान दिले. तो म्हणाला, ‘मी आधी फलंदाजी करत असलेल्या फलंदाजीच्या क्रमाने वरती फलंदाजी केली. दुसरी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. कोचिंग स्टाफ, कर्णधार आणि सर्व खेळाडूंनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे. मी चांगली कामगिरी करू शकेन, असा विश्वास होता. एक खेळाडू म्हणून तुम्हाला हीच ऊर्जा हवी आहे आणि तीच मला दिली गेली”, असंही राशिदने सांगितले.

दरम्यान, अफगाणिस्तानच्या युवा फिरकीपटूने सांगितले की, राजस्थान रॉयल्सविरुद्ध रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी तो चेंडू आणि बॅटने पूर्णपणे तयार आहे. गुजरातचा संघ पहिल्या सत्रात अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर राजस्थानचा संघ २००८ नंतर पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहोचला आहे.

 व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

राजस्थानच्या ‘या’ जोडीवर मात करू शकले नाही, तर गुजरातसाठी ट्रॉफी जिंकणे कठीण

‘दडपणाखाली होतो, पण त्याच्या प्रेरणादायी शब्दांनी मदत केली’, बटलरने ‘या’ दिग्गजाला दिले यशाचे श्रेय

IPL Final | गुजरात वि. राजस्थान सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---