आयपीएल स्पर्धेच्या १५ व्या हंगामाची सुरुवात २६ मार्च (शनिवार) रोजी झाली. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन फ्रँचायझी त्यांच्या पहिल्या सामन्यात एकमेकांशी भिडणार आहेत. या दोन संघातील पहिला सामना २८ मार्च रोजी खेळली जाईल. हार्दिक पंड्याकडे गुजरात संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आधीच सोपवली गेली आहे. अशात आता गुजरात टायटन्सने स्वतःचा पहिला सामना खेळण्यापूर्वी संघाच्या उपकर्णधाराचे नाव घोषित केले आहे.
भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू आणि मुंबई इंडियन्सला अनेक महत्वाचे सामने जिंकवून देणारा हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मुंबईने रिलीज केल्यानंतर गुजरात टायटन्सने मेगा लिलावाच्या आधी हार्दिकला १५ कोटींमध्ये संघात रिटेन केले.
हार्दिकसोबतच गुजरातने अफगाणिस्तानी दिग्गज फिरकी गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) यालाही १५ कोटींमध्ये रिटेन केले. हार्दिकला गुरजातने कर्णधार म्हणून आधीच घोषित केले होते आणि आता राशिद खानला संघाने उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. या दोघांव्यतिरिक्त युवा शुबमन गिलला देखील गुजरातने रिटेन केले होते.
आयपीएलच्या या हंगामात चाहते राशिद खानेच प्रदर्शन पाहण्यासाठी उत्सुक आहेत. गुजरात टायटन्सच्या चाहत्यांना राशिदला त्यांच्या संघासाठी कमाल प्रदर्शन करताना पाहायचे आहे. टी-२० क्रिकेटमध्ये राशिद जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. पहिल्या सामन्यात गुजरातसमोर ज्या लखनऊ संघाचे आव्हान असेल, त्यांचे नेतृत्व भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुल करणार आहे. उभय संघातील या सामन्यात हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांच्यातील संघर्ष पाहण्यासारखा असेल.
दरम्यान, लखनऊ आणि गुजरात या दोन नवीन फ्रँचायझी स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे आयपीएलमधील संघांची संख्या ८ वरून १० झाली आहे. यावर्षी आयपीएलमध्ये संघांची संख्या वाढल्यामुळे सामन्यांची संख्याही वाढली आहे. या हंगामात एकूण लीग स्टेजचे ७० सामने खेळले जातील. सर्व सामने मुंबई आणि पुणे स्थित चार स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.
गुजरात टायटन्स संघ –
हार्दिक पंड्या (कर्णधार), राशिद खान (उपकर्णधार), शुबमन गिल, साई सुदर्शन, अभिनव मनोहर, डेविड मिलर, गुरकीरत सिंग मन, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, रहमानुल्ला गुरबाज, विजय शंकर, राहुल तेवतिया, डॉमिनिक ड्रेक्स, जयंत यादव, वरुण ऍरॉन, दर्शन नालकांडे, यश दयाल, प्रदीप सांगवान, अल्जारी जोसेफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, लॉकी फर्ग्यूसन, रविश्रीनिवासन साई किशोर
महत्वाच्या बातम्या –
भारतीय क्रिकेटचे पहिले विक्रमादित्य ‘पॉली उम्रीगर’, कर्णधारपद सोडले पण निर्णय नाही बदलला!
हे ‘स्लो ओव्हर रेट’ म्हणजे काय रे भावड्या? भल्याभल्या संघनायकांनाही याच्या भितीने फुटतोय घाम