अफगाणिस्तानचा राशीद खान भारताविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे. अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना हा बेंगलोर १४ ते १८जून या काळात होणार आहे.
राशीद खान मर्यादित षटकांच्या क्रिकेट केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे सर्वांना परिचित आहे.
फेब्रुवारीमध्ये आयसीसी वनडेच्या गोलंदाजी क्रमवारीत तो पहिल्या स्थानावर होता. याबरोबरच तो आयसीसीच्या कोणत्याही प्रकारच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान होणारा सर्वात युवा खेळाडु ठरला आहे.
तसेच त्याला वनडेमध्ये नेतृत्व करताना सर्वांत कमी वयात कर्णधारपद भुषवण्याचा मानही मिऴाला.आयपीएलम़ध्ये ही त्याने सर्वोत्तम कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले आहे.
अफगाणिस्तान पुढील महिन्यात भारताविरूध्द एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांचा पहिलाच कसोटी सामना खेळणार आहेत.
अफगाणिस्तान क्रिकेटसाठी तो दिवस ऐतिहासिक असणार आहे. त्यादिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय, आमच्या देशातील लोक क्रिकेटचे अक्षरश वेडे चाहते आहेत असे राशीद म्हणाला.
या सामन्यामुळे राशीदचे कसोटी क्रिकेट खेऴण्याचे स्वप्न साकार होणार आहे. 2009 मध्ये अफगाणिस्तानने पहिला एकदिवसीय सामना खेळला होता,तर 2013 मध्ये त्यांना आयसीसीच्या सहयोगी देशांचा दर्जा मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या-
–पहा व्हिडिओ- मांजरीने घातला चालु सामन्यातच धुमाकूळ
–क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या स्फोटात ८ जण ठार
-म्हणून आजच्या दोन्ही आयपीएल सामन्यांना आहे महत्त्व!
–या दोन संघांना आयपीएलमध्ये पडले आहेत षटकारांचे सर्वाधिक फटके
–मुंबई नाही तर या दोन संघांनी आयपीएलमध्ये केली आहे षटकारांची बरसात