---Advertisement---

राशिद खानचा फलंदाजीत जलवा! टी२० सामन्यात ठोकला विचित्र षटकार, व्हिडिओ व्हायरल

On: रविवार, जुलै 18, 2021 3:10 PM
---Advertisement---

अफगाणिस्तान संघाचा स्टार क्रिकेटपटू राशिद खान फक्त आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी नाही, तर अनेकदा तळातल्या क्रमांकावर आपल्या आक्रमक फलंदाजीने दिलेल्या योगदानामुळेही चर्चेत असतो. त्याच्या याच आक्रमक फलंदाजीची एक झलक इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विटालिटी ब्लास्ट या सामन्यात पाहायला मिळाली.

राशिद खानची आक्रमक फलंदाजी
अफगाणिस्तान संघाचा क्रिकेटपटू राशिद खान हा सध्या विटालिटी ब्लास्ट या स्पर्धेमध्ये ससेक्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. या स्पर्धेमध्ये हॅम्पशायर आणि ससेक्स संघामध्ये सामना सुरू होता. याच सामन्यादरम्यान फलंदाजी करत राशिदने 13 चेंडू मध्ये 26 धावांचे संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले. या खेळीमध्ये 4 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे.

विचित्रपणे खेळला षटकार
हॅम्पशायरकडून स्कॉट करीने 19 व्या षटकातील तिसरा चेंडू टाकला, तेव्हा राशिद खानने एक विचित्र पद्धतीने शॉट खेळला आणि चेंडूला थेट सीमारेषेच्या बाहेर पाठवले. इतकेच नव्हे तर असे त्याने आणखी बरेच शॉट्स खेळले आहेत.

https://twitter.com/VitalityBlast/status/1416115846464823299

पराभवाचा केला सामना
ससेक्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकांमध्ये 6 विकेट गमावत 183 धावा केल्या होत्या. यानंतर हॅम्पशायर संघ मैदानावर फलंदाजी करण्यास उतरला. या संघाने फलंदाजी करत 19.2 षटकांमध्ये 4 विकेट गमावत 184 धावा केल्या आणि हॅम्पशायर संघाने 6 विकेटने हा सामना आपल्या खिशात घातला.

अफगाणिस्तान संघाचा फिरकीपटू राशिद खानने आतापर्यंत अनेक लीग खेळलेला आहेत. यामध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये राशिद खान सनरायझर्स हैदराबाद या संघाचा एक भाग आहे. त्याचबरोबर कॅरिबियन प्रीमियर लीग, बिग बॅश लीग, अफगानिस्तान प्रीमियर लीग, पाकिस्तान सुपर लीग असे अनेक स्पर्धा खेळले आहेत.

ऑक्टोबर 2017 मध्ये इंग्लंडमधील ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबकडून तो खेळला होता. त्याचबरोबर तो अजूनही या संघाचे प्रतिनिधित्व करतो. द हंड्रेडच्या पहिल्यांदा प्लेअर ड्राफ्ट दरम्यान राशिद सर्वात जास्त किंमतीच्या बॅन्डमध्ये पहिल्यांदा ट्रेंट रॉकेट्ससाठी निवडलेला गेला होता.

ऑक्टोबर 2018 मध्ये त्याला मझांसी सुपर लीग टी20 स्पर्धेच्या पहिल्या हंगामासाठी डर्बन हीटच्या संघात स्थान देण्यात आले. तर जुलै 2019 मध्ये युरो टी20 स्लॅम क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन दरम्यान रॉटरडॅम र्हिनोसकडून खेळण्यासाठी त्यांची निवड झाली होती परंतु, त्यानंतरच्या महिन्यात ही स्पर्धा रद्द करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या – 

लाईव्ह सामन्यात धांय-धांय गोळीबार, प्रेक्षकांसह खेळाडूंचाही उडाला थरकाप; पाहा व्हिडिओ

आजपासून रंगणार श्रीलंका वि. भारत वनडे मालिका; पाहा कधी, कुठे आणि कसा पाहता येईल सामना?

जेव्हा ‘द वॉल’ची बॅट घेऊन स्म्रीती उतरली होती मैदानात, झळकावले होते झंझावती द्विशतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---