अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशीद खानला भारतीय कर्णधार विराट कोहलीकडून एक बॅट भेट म्हणून मिळाली होती. राशीदला जगातील दिग्गज फलंदाजांच्या बॅट भेट म्हणून स्विकारायला आवडतात. त्यामुळे त्याला विराट कोहली, डेव्हि़ड वॉर्नर आणि केएल राहुल यांच्याकडून बॅट मिळाल्या आहेत.
याबद्दल त्याने cricket.com.au ला दिलेल्या मुलाखतीमध्ये खूलासा केला आहे. त्याने सांगितले की ‘जेव्हा तूम्ही फलंदाजीतील कौशल्य शिकत असता तेव्हा तूम्हाला चांगल्या बॅटचीही गरज असते. मला काही खेळाडूंकडून बॅट मिळाल्या आहेत.’
‘मला विराट, वॉर्नर, राहुल यांच्याकडून बॅट मिळाल्या आहेत आणि त्या बॅट खास आहेत. त्या बॅट मला विश्वचषकात काही धावा करण्यासाठी मदत करतील.’
असे असले तरी विराटची बॅट मात्र आता राशीदकडे नाही. याबद्दल सांगताना त्याने हे देखील सांगितले की विराटने भेट दिलेल्या बॅटने त्याने आयर्लंडमध्ये खेळताना ती बॅट वापरली होती आणि त्या बॅटमधून काही बांउंड्रीही मारल्या.
विराटच्या बॅटबद्दल सांगताना राशीद म्हणाला, ‘ मला कळालेच नाही काय झाले. चेंडू षटकारासाठी गेला. मला असे वाटले की त्या बॅटमध्ये काहीतरी खास आहे. मला ती बॅट आवडली. असे वाटत होते की प्रत्येक चेंडूवर मी षटकार मारत आहे.’
पण ती बॅट अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगाणने स्वत:कडे ठेऊन घेतली. याबद्दल सांगताना राशीद म्हणाला, ‘मी पॅव्हेलियनमध्ये आल्यावर आमचा आधीचा कर्णधार असगर अफगाण माझ्याकडे आला आणि म्हणाला, ती बॅट मला दे आणि मी मनात म्हणाले नाही. पण त्याने आधीच ती बॅट माझ्या बॅगेतून काढून त्याच्या बॅगमध्ये ठेवली होती.’
‘ती बॅट खास खेळाडूकडून मिळालेली खास बॅट होती. मला आशा आहे की तो(अफगाण) त्या बॅटने विषेश काही करणार नाही आणि मला ती बॅट परत देईल.’
राशीदने या विश्वचषकाची सुरुवात चांगली केली आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1 जूनला झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून 11 चेंडूत 27 धावा केल्या. तसेच 1 विकेटही घेतली. मात्र या सामन्यात अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टीम इंडियातील हा खेळाडू सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराचे मत
–शोएब अख्तरला ते ट्विट पडले महागात, इंग्लंडच्या फलंदाजाने केले ट्रोल





