आयसीसी 2019 विश्वचषकात 5 जूनला भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार आहे. पण या सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने भारताचा कर्णधार विराट कोहलीबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
रबाडाने इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना विराट आणि त्याच्यामध्ये आयपीएल दरम्यान झालेल्या शाब्दिक चकमकीबद्दल खूलासा केला आहे. त्याचबरोबर त्याने यावेळी विराट अपरिपक्व असल्याचे म्हटले आहे.
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा रबाडा म्हणाला, ‘मी त्यावेळी(दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सामन्यादरम्यान) फक्त माझ्या खेळाच्या योजनेबद्दल विचार करत होतो. पण विराटने मला चौकार मारला आणि मला येऊन काहीतरी बोलला. त्यानंतर जेव्हा तूम्ही त्याला उत्तर देता तेव्हा तो चिडतो. मला तो खेळाडू समजलेला नाही.’
‘कदाचित तो असे करत असेल कारण त्यातून त्याला फायदा मिळत असेल. पण माझ्यासाठी ही खूप अपरिपक्वतेची वागणूक आहे. तो अभूतपूर्व खेळाडू आहे, पण त्याला कोणी उत्तरे दिलेली आवडत नाही. या गोष्टी तूमचे लक्ष विचलित करु शकत नाही.’
‘त्यावेऴी हॉटेलवर परत येत असताना मी बसमध्ये विचार करत होतो की हा व्यक्ती(विराट) मैदानावर नेहमी चिडल्यासारखा वाटतो. तो खरच चिडलेला असतो का, मग मी विचार केला तो जरी चिडलेला असेल तरी माझे काय बिघडवणार आहे.’
रबाडा पुढे म्हणाला, ‘खरंतर मला त्याने सजग केले. जर कोणी येऊन मला म्हणत असेल की ‘मी तूला मारेल. तू कमजोर आहेस.’ तर ही गोष्ट मला सजग करते. कारण यावेळी तूम्हाला लढा किंवा पळा यातील एक प्रतिसाद द्यायचा असतो.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: टीम इंडियाला पहिल्याच सामन्याआधी बसला जोरदार धक्का
–श्रीलंकेविरुद्ध १० विकेट्सने विजय मिळवणाऱ्या न्यूझीलंडने केला मोठा पराक्रम
–विश्वचषक २०१९: या कारणामुळे आयोजकांना मागावी लागली चाहत्यांची माफी, तिकीटांचे पैसेही करणार परत