---Advertisement---

“कृपया अफगाणांना मारणे थांबवा,” राशिद खानची आर्त हाक

---Advertisement---

अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी(26 ऑगस्ट) काबूल विमानतळाजवळ दोन आत्मघाती बॉम्बस्फोटांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला. दोन स्फोटांनंतर विमानतळावर आणखी हल्ले होण्याची भीती असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत क्रिकेटपटू राशिद खानने ट्विट करून अफगाणिस्तानमधील तणावाबाबत आपली निराशा व्यक्त केली आहे.

रशीदचे ट्विटमध्ये वाचल्यावर जे निश्चितच त्याची निराशा कळते. रशीदने लिहिले आहे की, “काबुलमध्ये पुन्हा रक्तपात होत आहे, कृपया अफगाणांना मारणे थांबवा.” रशीदच्या या ट्विटवर सोशल मीडिया वापरकर्ते आपली प्रतिक्रिया देत आहेत.

रशीद सध्या इंग्लंडमध्ये आहे. सध्या तो टी-20 ब्लास्ट स्पर्धा खेळत आहे. टी-20 ब्लास्ट स्पर्धा खेळल्यानंतर तो आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा खेळण्यासाठी यूएईला जाईल.

राशिद खान व्हिसेलिटी ब्लास्टमध्ये ससेक्स संघाकडून खेळत आहे. मंगळवारी(24 ऑगस्ट) यॉर्कशायरविरुद्धच्या सामन्यात रशीदने अप्रतिम खेळी खेळली आणि केवळ 9 चेंडूत 27 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानमध्ये तणाव असूनही रशीद त्याच्या खेळामध्ये पूर्ण 100 टक्के देत आहे.

अलीकडच्या काळात अफगाणिस्तानमध्ये ज्या प्रकारे लोक आपला जीव गमावत आहेत त्यावर रशीदने यापूर्वीही नाराजी व्यक्त केली होती. रशीदने यापूर्वी याबाबत ट्विट केले होते. त्याचवेळी रशीदचे कुटुंब अफगाणिस्तानात आहे. तालिबानच्या हल्ल्यानंतर त्याला त्याच्या कुटुंबाची काळजी वाटत आहे. रशीद, केविन पीटरसनशी याबाबत बोलला होता.

अलीकडेच इंग्लंडचे माजी खेळाडू केविन पीटरसन यांनी राशिद खानची परिस्थिती सांगताना म्हटले की, “अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान आपल्या देशातील परिस्थितीमुळे चिंतेत आहे. कारण रशीद आपल्या कुटुंबाला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यास यश येत नाही.”

पीटरसन पुढे म्हणाला “अफगाणिस्तानमध्ये बऱ्याच गोष्टी घडत आहेत. आम्ही याबद्दल बरीच चर्चा केली आहे आणि रशीद खूप काळजीत आहे. तो आपल्या कुटुंबाला अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यास असमर्थ आहे. त्याच्यासाठी ही वेळ खूप कठीण आहे. रशीदच्या इतक्या दबावाखाली राहून देखील तो स्पर्धेत खूप चांगलं प्रदर्शन करत आहे. हे खूप प्रेरणादायी आहे.” दरम्यान राशीदने केलेल्या ट्विटनंतर चाहत्यांनी ट्विटचा पाऊस पाडत त्याचे मनोधैर्य वाढवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणे आंगलट आले का? पंतने दिले उत्तर

इंग्लंडच्या चाहत्यांचे निंदनीय कृत्य; सिराजवर फेकून मारला बॉल, रिषभ पंतने दिली घटनेची माहिती

फलंदाजीमध्ये ९९.९४ची जबरदस्त सरासरी असलेल्या ब्रॅडमन यांना ‘या’ गोलंदाजानी दिला सर्वाधिक त्रास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---